शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. हा बहुचर्चित चित्रपट अखेरीस प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. सध्या सोशल मीडियावरही फक्त शाहरुखच्या ‘पठाण’चीच हवा आहे. या चित्रपटामध्ये चाहत्यांसाठी खास सरप्राइज आहे. सलमान खान शाहरुखच्या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून काम करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पठाण’चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी आधीच तिकिटं बुक केली होती. दरम्यान हा चित्रपट लीक झाला असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय आता सलमानचा या चित्रपटामधील सीनही सोशल मीडियावर लीक झाला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने सलमान व शाहरुख रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान शाहरुखसह अ‍ॅक्शन सीन करताना दिसत आहे. तसेच सलमानची एण्ट्री होताच चित्रपटगृहामधील प्रेक्षक आनंदाने ओरडताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. ‘पठाण’मध्ये सलमानला पाहून चाहतेही खूश झाले आहेत.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’ने प्रदर्शनापूर्वीच २४ कोटींपेक्षा अधिक कमाई कशी केली? ‘बाहुबली २’चाही मोडला रेकॉर्ड

शाहरुख, दीपिका व जॉन अब्राहम या त्रिकुटाचा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला या चित्रपटाबाबत बरेच वाद रंगले. मात्र त्याचा चित्रपटावर कोणताच परिणाम झाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट बॉक्सऑफिसवर कितपत कमाई करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan deepika padukone pathaan movie salman khan cameo role leak on social media watch video kmd