शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुखच्या जबरा फॅननी तर काही ठिकाणी संपूर्ण थिएटरचं बुक केलं आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच आगाऊ बुकिंगमध्ये कोट्यवधी रुपयांची कमाई केली असल्याचं बोललं जात आहे. अशामध्येच आता एक नवी माहिती समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : ‘पठाण’साठी सांगली, अमरावतीच्या तरुणांनी बुक केलं संपूर्ण थिएटर, शाहरुख खानही भारावला, म्हणाला, “तुम्हाला…”

शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर परतणार म्हटल्यावर चाहते भारावून गेले आहेत. शिवाय प्रदर्शनापूर्वीच ‘पठाण’चे शो हाऊसफुल झाले आहेत. पण आता नव्या माहितीनुसार ‘पठाण’ पाहण्यासाठी प्रेक्षक हजारो रुपये खर्च करत आहेत. जवळपास २००० ते २४०० रुपयांपर्यंत ‘पठाण’चं तिकिट विकलं जात आहे.

२० जानेवारीपासून चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. गुरुग्रामच्या एंबियंस मॉलमध्ये ‘पठाण’चं तिकिट २४००, २२०० व २००० रुपायला विकलं जात आहे. तिकिट इतकं महाग असूनही चित्रपटाचे संपूर्ण शो हाऊसफुल आहेत. शाहरुखला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटाचं महागडं तिकिटही विकत घेत आहेत.

आणखी वाचा – Athiya Shetty-KL Rahul Wedding : पाहुणेमंडळींना ताटामध्ये नव्हे तर केळीच्या पानात वाढणार जेवण, लग्नात कोणत्या प्रकारचे पदार्थ असणार?

एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, दिल्ली येथील काही मल्टिप्लेक्समध्ये २१०० रुपयांपर्यंत ‘पठाण’चं तिकिट विकलं जात आहे. तर सकाळच्या शोच्या तिकिटांची किंमत जवळपास १००० रुपयांच्या घरात आहे. ‘पठाण’ने आतापर्यंत १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली असल्याचं बोललं जात आहे.

शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळणार अशी चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबरीने जॉन अब्राहमलाही या चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. २५ जानेवारील बहुचर्चित ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan deepika padukone pathaan movie tickets sell for rupees 2400 see details kmd