‘पठाण’ चित्रपट आणि त्यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद हा काहीकेल्या थांबायचं नाव घेत नाहीये. दीपिकाने परिधान केलेली भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सुरू झालेला हा वाद आता ‘बॉयकॉट पठाण’ या व्हायरल ट्रेंडपर्यंत येऊन पोहोचला आहे. अशातच या चित्रपटाच्या पुढील गाण्याची चर्चा जोर धरू लागली होती.

आता ‘पठाण’मधील शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्यावर चित्रित झालेलं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘झुमे जो पठाण’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं नुकतंच यश राज फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आणि युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातही शाहरुख आणि दीपिका यांची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. शाहरुख खानने नुकतंच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या नवीन गाण्याचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला होता. हे गाणं हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा ३ भाषांमध्ये बघायला मिळणार आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

आणखी वाचा : चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”

आधीच्या गाण्यात आपल्याला फक्त दीपिकाचा मोहक अदा आणि शाहरुखची थोडी झलक बघायला मिळाली होती. या नव्या गाण्यात मात्र दीपिकाबरोबर शाहरुखसुद्धा थिरकताना दिसत आहे. या गाण्यात शाहरुखचा डॅशिंग लूक आणि त्याचे परिधान केलेले कपडे हे त्याच्या ‘पठाण’ या पात्राला अगदी सूट होत आहेत, तर दीपिका नेहमीप्रमाणेच तिच्या बोल्ड अवतारात बघायला मिळत आहे. दोघांमधील बोल्ड केमिस्ट्री हे या गाण्याचं मुख्य आकर्षण आहे. शिवाय शाहरुखची नेहमीची पोजसुद्धा या गाण्यात आपल्याला बघायला मिळेल.

आणखी वाचा : “पठाणचा ट्रेलर पाहून मी…” ४ वर्षांनी ॲक्शनपटातून कमबॅक करणाऱ्या शाहरुख खानचा खुलासा

एकूणच विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं, अरिजित सिंग आणि सुकृती कुमारच्या आवाजातील हे नवं ‘झुमे जो पठाण’ हे गाणं शाहरुखच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरू शकेल. शिवाय दीपिकाच्या मोहक अदांनी या गाण्यात एक वेगळीच जान आणली आहे. नुकतंच हे गाणं यश राज फिल्म्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख, दीपिकाबरोबरच जॉन अब्राहमही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Story img Loader