अभिनेता शाहरुख खान आणि त्याची लोकप्रियता या दोन गोष्टी कधीही वेगळ्या करता येऊ शकत नाहीत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते वेडे असतात. आतापर्यंत त्याच्या सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. तसंच आगामी काळातही तो नव्या चित्रपटांमधून आपल्या भेटीला येणार आहे. सध्या बॉलिवूडचे चित्रपट बॉयकॉट केले जात असताना शाहरुख खानला त्याची भीती नसल्याचं त्याने सांगितलं आहे.

‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे आणि यासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. अशातच शाहरुख नुकताच शारजाहला गेला होता. ‘शारजाह इंटरनॅशनल बूक फेअर’ या सोहळ्यात शाहरुखचा चित्रपटसृष्टीतील योगदान आणि ग्लोबल आयकन महणून गौरव करण्यात आला. यानिमित्ताने शाहरुखची एक छोटीशी मुलाखतही घेण्यात आली. यावेळी त्याने त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल भाष्य केलं.

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स
Ajanta Verul Film International Film
ठरलं! ‘या’ तारखांना होणार अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ‘कालिया मर्दन’ मूकपटाचं खास सादरीकरण
Nandkumar Ghodele will join Shiv Sena Shinde faction
Nandkumar Ghodele : ठाकरे गटाला मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील ‘हा’ नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
Mahadev Jankar on Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : “एखादा पक्ष काढा आम्ही तुमच्याबरोबर युती करू”; भुजबळांना महादेव जानकरांचा सल्ला
maddcok universe new release date stree 3 munjya 2
ठरलं! ‘स्त्री २’ अन् ‘मुंज्या’चा पुढचा भाग येणार…; ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली तब्बल ८ चित्रपटांची घोषणा, श्रद्धा कपूर म्हणाली…

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या यंदाच्या चित्रपटांपैकी ‘ऊंचाई’ने पहिल्या दिवशी केली सर्वाधिक कमाई; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची यादी मोठी आहे. ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ या चित्रपटात तो पुढील वर्षी दिसणार आहे. या चित्रपटांबद्दल त्याला ‘शारजाह इंटरनॅशनल बूक फेअर’ येथे घेतलेल्या मुलाखतीत त्याला “तुला तुझे आगामी चित्रपट हिट होतील की नाही अशी चिंता वाटते का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शाहरुखने त्याचे हे सगळे चित्रपट सुपरहिट होणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला.

शाहरुख म्हणाला, “मला माझ्या आगामी चित्रपटांची काळजी करण्याची गरज नाही कारण ते सर्व सुपरहिट चित्रपट असणार आहेत. हे विधान मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये केलेलं नाही. ते याच विश्वासाला उराशी बाळगून झोपतो. हा विश्वासच मला ५७ व्या वर्षीय स्टंट करण्यासाठी आणि दिवसातील १८ तास काम करण्याची ताकद देतो.

हेही वाचा : “तेव्हा शाहरुखने मला…”; अभिषेक बच्चनने जागवल्या स्ट्रगलच्या काळातल्या आठवणी

पुढे तो म्हणाला, “मी करत असलेला चित्रपट जास्त लोकांना आवडणार नाही, असं मला वाटलं तर तो चित्रपट मी करत नाही. त्यामुळे मी जे बोललो ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये नाही. मी एक उत्कृष्ट चित्रपट केला आहे, या चित्रपटात काम करताना मी पूर्ण मेहनत घेतलेली आहे, मी चित्रपट मनापासून केला आहे तर मी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार याची मला खात्री आहे. त्यामुळे माझ्या आगामी चित्रपटांची मला काळजी करण्याची गरज वाटत नाही.” त्याच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.

Story img Loader