शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. उद्या हा चित्रपटगृहातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल शाहरुखच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. शाहरुख खान या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने या चित्रपटाची त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम मिळत आहे. आता अशातच त्याची एक अपुरी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

शाहरुखने त्याच्या ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याच सेशदरम्यान त्याने त्याची अजून पूर्ण व्हायची बाकी असलेली इच्छा व्यक्त केली.

आणखी वाचा : Video: ‘पठाण’चे प्रदर्शन तोंडावर आले असतानाच शाहरुख खानला मागावी लागली सर्वांची माफी, म्हणाला…

या सेशनदरम्यान त्याच्या एका चाहत्याने त्याला विचारलं, “तुझी अशी कुठली इच्छा आहे का जी अजून पूर्ण झालेली नाही?” त्यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, “इतकी शक्ती माझ्यात कायम राहूदे की मी तुमच्या मुलांचंही मनोरंजन करू शकेन.” त्याच्या या उत्तराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या ट्वीटवर कमेंट करत त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हेही वाचा : ‘पठाण’ने मोडला ऑस्करच्या शर्यतीत आलेल्या ‘आरआरआर’चा रेकॉर्ड, ‘या’ बाबतीत चित्रपटाला टाकलं मागे

दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Story img Loader