अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरीलही काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तसंच शाहरुख खानने त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं रिटर्न गिफ्ट दिलं आहे. या दिवशी किंग खानच्या ‘पठाण’ चा टीझर प्रदर्शित झाला. ‘यशराज फिल्म्स’च्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुख खान एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरचा जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण हे कलाकारही महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. पण आता शाहरुख खानने या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘पुष्पा’च्या दिग्दर्शकांनी एकत्र येत प्रेक्षकांना दिली खास भेट, ट्वीट करत म्हणाले…

अलीकडेच त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वांद्रे येथे त्याने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलही बऱ्याच गोष्टी उघड केल्या. यावेळी त्याने त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दलही भाष्य केलं. यावेळी बोलताना त्याने या चित्रपटाच्या पुढील भागाचा उल्लेख करत ‘पठाण २’ प्रदर्शित होण्याबद्दल काही गोष्टी उपस्थितांना सांगितल्या.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान यादरम्यान म्हणाला, “‘पठाण’ या चित्रपटासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि मला आशा आहे की हा चित्रपट सर्वांना आवडेल. चित्रपट हिट व्हावा आणि त्याचा दुसरा भागही यावा यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा. जेणेकरून आम्ही लवकरात लवकर सिक्वेलचे काम सुरू करू शकू.”

हेही वाचा : Video: शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर खास रोषणाई, हटके अंदाजात दिल्या गेल्या किंग खानला शुभेच्छा

शाहरुख खान अखेरचा अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता तो लवकरच ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर परतताना दिसणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan expressed his views about pathaan sequel rnv