शाहरुख खानचं फॅन फॉलोइंग केवढं आहे हे आपल्याला ठाऊक आहेच. याबरोबरच शाहरुख खान हा त्यांच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही हेदेखील आपल्याला ठाऊक आहे. आज जगभरात त्याचे लाखों चाहते आपल्याला पाहायला मिळतात. अशाच एका शाहरुखच्या वयोवृद्ध चाहतीने तिची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. ‘पठाण’च्या या चाहतीने मरण्याआधी किंग खानला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम बंगालमधील ६० वर्षीय शिवानी चक्रवर्ती या शाहरुखच्या जबरदस्त फॅन आहेत. दुर्दैवाने सध्या त्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. या अवस्थेतही त्यांनी शाहरुख खानचा एकही चित्रपट चुकवलेला नाही. त्यांनी शाहरुख आणि दीपिका या दोघांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय शाहरुखच्या आयपीएल टीम मुळे शिवानी यांना क्रिकेटचीही आवड लागल्याचं त्या सांगतात.

आणखी वाचा : “त्याला या गोष्टींचा…” चित्रपटसृष्टीतील राजकारण आणि सुशांत सिंग राजपूतबद्दल मनोज बाजपेयींचं मोठं वक्तव्य

‘आज तक’शी शिवानी यांनी संवाद साधताना त्यांनी मृत्यूआधी शाहरुख खानला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, “डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की मी फार दिवस जगणार नाही. माझी एकच शेवटची इच्छा आहे की मरण्याआधी शाहरुख खानला भेटता यावं. मला त्याला प्रत्यक्षात बघायचं आहे. मी त्याला माझ्या हातचे बंगाली पदार्थ खाऊ घालू इच्छिते.”

शाहरुख इतका मोठा असूनही तो आजही लोकांशी जोडलेला कसा आहे हा प्रश्न शिवानी यांना शाहरुखला विचारायचा आहे. सध्या शाहरुख खान ‘डंकी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. शिवाय त्याचा ‘जवान’ हा चित्रपटही ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. शिवानी यांची शाहरुखला भेटायची इच्छा पूर्ण होणार की नाही ते येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan fan express her last wish while going through terminal cancer avn