शाहरुख खानच्या ‘पठाण’ची जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, पण तरी सगळीकडे याचं ऍडव्हान्स बुकिंग अगदी जोरात सुरू आहे, शाहरुखचे चाहते तर त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पहिल्या गाण्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीने कित्येकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच लोकांनी यावर टीका केली तर काही या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला.

पठाण पहिल्या दिवशी ४० कोटीची कमाई करू शकतो अशी शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे. शाहरुखचे चाहते त्याचा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी तरसले असताना त्याच्या एका चाहत्याने मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुखला धमकी दिली आहे. येत्या २५ जानेवारीला शाहरुखचा चाहता आत्महत्या करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

आणखी वाचा : ‘RRR’चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले “मी चित्रपट केवळ पैशांसाठी…”

शाहरुखच्या या चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो म्हणतोय की, जर २५ तारखेला ‘पठाण’चा पहिला शो त्याला बघायला मिळाला नाही तर तो जीव देणार आहे. व्हिडिओमध्ये बाजूला दिसणाऱ्या तलावात तो उडी मारून आत्महत्या करणार असल्याचं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्याच्याकडे पैशांची समस्या आहे आणि त्याला कुणीही ‘पठाण’च्या पहिल्या शोचं तिकीट काढून देण्यास मदत करत नाहीये, म्हणूनच त्याने २५ जानेवारीला आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा मुलगा कोण आहे? कुठे राहतो? याचा पत्ता अजूनही लागलेला नाही. ‘पठाण’चं ऍडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असून पटापट शोज हाऊसफुल्ल होत आहेत. या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. याच दीपिका पदूकोण अॅक्शन मोडमध्ये आणि जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader