बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख, दीपिका आणि जॉन यांच्या या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. करोना काळानंतरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. सर्व माध्यमातून शाहरुख खानबद्दलची क्रेझ चाहते व्यक्त करत आहेत. आता एका कुटुंबाने ‘पठाण’ पाहण्यासाठी बांगलादेशहून थेट भारतात झेप घेतली.

‘पठाण’ या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून ५०० कोटीहून अधिक तर जगभरातून ८०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानबद्दल प्रेम दर्शवण्यासाठी अनेकांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर्सच बूक केली. तर या चित्रपटाचा शो सुरू असताना चित्रपटगृहतील माहोल कसा असतो हे दर्शवणारे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आता अशातच सोशल मीडियावर एका कुटुंबाचा फोटो चर्चेत आला आहे. शाहरुखचे फॅन असलेलं हे कुटुंब फक्त हा चित्रपट पाहण्यासाठी बांगलादेशहून भारतात आलं.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

आणखी वाचा : याला म्हणतात स्वॅग! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता

‘पठाण’ परदेशात २५०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पण काही कारणांमुळे हा चित्रपट बांगलादेशमध्ये प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे हे कुटुंब ढाका येथून त्रिपुरा येथे आलं. आगरतळा येथील सिनेमा हॉलचे मालक सतदीप साहा यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सतदीप साहा यांनी लिहिलं की, “हे खूप मनोरंजक आहे. ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह बांगलादेशातून लोक भारतात येत आहेत.” आता त्यांचं हे ट्वीट पाहून आणि या चाहत्यांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी केलेला प्रवास ऐकल्यावर सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा : भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर त्यांच्याबरोबरच या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ आहे.

Story img Loader