४ वर्षांनी ‘पठाण’मधून कमबॅक करत शाहरुख खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं कि बॉक्स ऑफिसचा किंग हा अजूनही तोच आहे. शाहरुखच्या लोकप्रियतेबद्दल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. नुकतंच शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर असं काही केलं खुद्द किंग खानसुद्धा भावूक झाला.
मुंबईतील शाहरुखच्या घराबाहेर म्हणजे ‘मन्नत’ बाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी एकत्र त्याची सिग्नेचर स्टेप करत एक वेगळाच विश्वविक्रम रचला आहे. शाहरुखच्या घराबाहेर कायमच त्याच्या चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई फिरायला येणारा प्रत्येकजण एकदा तरी शाहरुखच्या घराबाहेर येऊन फोटो काढतोच. नुकतंच शाहरुखच्या तब्बल ३०० चाहत्यांनी त्याला एक झकास सरप्राइज दिलं.
आणखी वाचा : गोविंद नामदेव यांनी सांगितला ‘ओह माय गॉड’ चित्रपटातील रागीट साधूच्या पात्रामागील धमाल किस्सा; जाणून घ्या
या ३०० चाहत्यांनी एकत्र ‘मन्नत’ बाहेर शाहरुखची सिग्नेचर स्टेपची कॉपी करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ बनवल्याचं स्पष्ट झालं आहे. याच चाहत्यांबरोबर शाहरुखनेही चाहत्यांबरोबर ती स्टेप केली आणि हात जोडून सगळ्यांना अभिवादन केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नुकतंच शाहरुखने ‘पठाण’मधून जबरदस्त कमबॅक केला आहे. आता त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. ‘जवान’ ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे, तर ‘डंकी’चं चित्रीकरण पूर्ण झालं असून लवकरच त्याबद्दल अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.