मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी भांडताना दिसत आहेत.
अंबानींच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’च्या इव्हेंटमध्ये शाहरुख खानने परफॉर्म केले होते. त्याने सर्वांची मनं जिंकली होती. मात्र शाहरुखची एक क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे, ज्यात तो पत्नी गौरीबरोबर भांडताना दिसत आहे. तो गौरीशी रागात ओरडून बोलत असल्याचं दिसतंय.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते, तिथे म्युझिकचा आवाज जास्त असल्याने तो ओरडून बोलतोय. तर, काहींना मात्र शाहरुखचं असं वागणं पटलेलं नाही. ते त्याला ट्रोल करत आहेत.