शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘पठाण’, ‘डंकी’ आणि ‘जवान’ असे तीन चित्रपट आहेत. त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाची बरीच चर्चा होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचे त्याचे काही बिहाईंड द सीन्स फोटोही व्हायरल झाले होते. पण त्यानंतर शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. आता याच ‘जवान’ चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने १००हून अधिक कोटींची कमाई केली आहे.
आणखी वाचा : ‘टायगर ३’ च्या प्रदर्शनाचा मुहूर्त बदलला, ईद नव्हे तर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
२०२३ मध्ये या शाहरुखचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यापैकी पठाण जवळजवळ पूर्णपणे तयार आहे, तर ‘जवान’च्या ओटीटी अधिकारांबाबत बातम्या येत आहेत. ‘जवान’मध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नयनताराचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा पहिल्या दिवसापासूनच दबदबा असक्याने या चित्रपटाचे ओटीटी हक्क आणि सॅटेलाइट हक्क यासाठी स्पर्धा पाहायला मिळत होती.
‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अॅमेझॉन प्राईम’ या स्पर्धेत आघाडीवर आहेत. या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क २५० कोटींना विकले गेल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. त्यानंतर एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जवान’चे ओटीटी हक्क ‘अॅमेझॉन प्राईम’ने १०० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत, असे म्हटले गेले आहे. जर खरोखर ‘अॅमेझॉन प्राईम’ने ‘जवान’चे हक्क १०० कोटींना विकत घेतले असतील तर रिलीज होण्यापूर्वीच ‘जवान’ खूपच फायद्यात आहे. कारण ओटीटी हक्क १००कोटींना विकले गेले आणि त्याआधी याशिवाय सॅटेलाइट हक्क २५० कोटींना विकले गेले आहेत म्हणजे प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने ३५० कोटींची कमाई केली आहे. अजूनही त्याचे टीव्ही आणि म्युझिक हक्क विकायचे आहेत. यासाठीही निर्माते मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : “बॉलिवूडमध्ये एक काळ असा येईल की…”, शाहरुख खानने ११ वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी ठरतेय खरी
शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘जवान’ हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासह अभिनेता विजय सेतुपतीदेखील दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. २०१८च्या ‘झीरो’ चित्रपटात तो दिसला होता.