शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीत ‘पठाण’ चित्रपट रिलीज झाल्यापासूनच ‘जवान’ची चर्चा रंगली होती. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘जवान’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या चित्रपटातील एका डायलॉगमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या डॉयलॉगवरुन करणी सेनेने चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा- ‘जवान’ प्रदर्शनाअगोदरच शाहरुखची चाहत्यांना खास भेट; अभिनेत्याने शेअर केला चित्रपटाचा ‘स्पॉइलर’

saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
yograj singh criticise aamir khan movie
आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Amit Shah in shirdi
Amit Shah : “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं”, अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार; उद्धव ठाकरेंवरही टीका!
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद

जवान चित्रपटात एक डायलॉग आहे. ‘एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भूखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था.’ करणी सेनेने चित्रपटाच्या निर्मात्यांना हा डायलॉग काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे. महाराणा प्रताप यांचा अशा प्रकारे अपमान केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो, असा इशाराही करणी सेनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह राठोड यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना दिला आहे.

शाहरुख खान या चित्रपटातून लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत आहे. करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोड यांनी सांगितले की, या संवादाबाबत मी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसे झाले नाही तर महाराणा प्रताप यांनी अकबराचे त्यावेळी काय केले होते. तोच प्रकार पुन्हा घडू नये अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच हा संवाद या चित्रपटातून त्वरित काढून टाकला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा- “तू फक्त अभिनयातला बादशाह नाहीस…” शाहरुख खानसाठी किरण मानेंनी केलेली खास पोस्ट चर्चेत

‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. हिंदीबरोबरच हा चित्रपट तमिळ, तेलगु भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader