शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. प्रदर्शित होताच हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात शाहरुख खान दीपिका पदुकोणबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. दीपिकाने गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘पठाण’च्या या गाण्यावरून वाद सुरु असतानाच आता शाहरुखने दुसऱ्या गाण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखने त्याच्या ट्विटरवर १७ नोव्हेंबरला ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याच सेशदरम्यान त्याने ‘पठाण’चं दुसरं गाणं कधी प्रदर्शित होणार हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video: वादात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ गाण्याचं कौतुक करणाऱ्याला दीपिका पदुकोणने दिलं ‘हे’ उत्तर, व्हिडीओने वेधलं लक्ष

‘आस्क एसआरके’ दरम्यान शाहरुखच्या एका चाहत्याने ट्विटरवर त्याला विचारलं, “‘पठाण’ चित्रपटातील दुसरं गाणं कधी येणार?” या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “दुसरं गाणं लवकरच प्रदर्शित होईल असं मला वाटतंय. मी ‘पठाण’च्या टीमकडून याची माहिती घेतो.” त्यामुळे आता ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद सुरू असतानाच दुसरं गाणं कोणत्या जॉनरचं आहे आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतोय हे ते प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल.

हेही वाचा : वादात सापडलेल्या ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी आकारलेले मानधन माहितेय का? आकडा ऐकून व्हाल थक्क

हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan gave hint about release of second song from pathaan rnv