शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. पण तसं जरी असलं तरी शाहरुख खान आणि ‘पठाण’बद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेली क्रेझ कमी झालेली नाही. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी, त्याचा एक रिप्लाय मिळवण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड आतुर असतात. आता अशातच एकाने त्याला त्याच्या होणाऱ्या बाळासाठी नाव सुचवण्याची विनंती केली. त्याला शाहरुखने दिलेला उत्तर आता चर्चेत आलं आहे.
शाहरुख खानचं फॅन फॉलोईंग प्रचंड मोठं आहे. भारतात आणि भारताबाहेर त्याचे करोडो चाहते आहेत. कोणी मन्नतबाहेर येऊन ते प्रेम दर्शवतात तर कोणी सोशल मीडियावरून. आता त्याच्या एका चाहत्याने ट्वीट करत त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी शाहरुखला नाव सुचवण्यास सांगितले.
आणखी वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं
एका चाहत्याने ट्वीट करत लिहिलं, “आम्हाला मुलगा किंवा मुलगी होईल त्याचं नाव तूच ठेव. प्लीज मला दोन्ही नावं सांग.” त्याच्या या ट्वीटने शाहरुखचं लक्ष वेधलं. शाहरुखनेही या ट्वीटला उत्तर दिलं. तो म्हणाला, “आधी तुम्हाला बाळ होऊ दे मग त्याचं नाव ठरवू. पण तुझं आणि तुझ्या पत्नीचं अभिनंदन. तंदुरुस्त रहा.” आता शाहरुखने हजरजबाबीपणे दिलेलं हे उत्तर सर्वांनाच आवडलं आहे. त्याच्या या उत्तरावर त्याचे इतर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा : Video: “नाही, मी तर…” शाहरुखला ‘तृतीयपंथी’ म्हणणाऱ्याला किंग खानचं सडेतोड उत्तर
दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.