शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

देशभरात ५५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणारा जवान पहिल्याच दिवशी ६० ते ७० कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज शाहरुख खानच्या ज्या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत त्यात शाहरुखच्या आयपीएल टीम केकेआरचा खूप मोठा वाटा आहे. नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेल्या एका खास व्हिडीओमध्ये शाहरुखने याचा खुलासा केला आहे.

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Election Commission officials check the helicopter of Union Home Minister Amit Shah
Amit Shah: आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी; उद्धव ठाकरेंप्रमाणेच व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले..
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड

आणखी वाचा : शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ पहिल्याच दिवशी रचणार इतिहास; कमावणार ‘इतके’ कोटी

अॅटलीला आधीपासूनच शाहरुखबरोबर चित्रपट करायचा होता का? याचं उत्तर देताना शाहरुख म्हणाला, “मी अॅटलीला ‘बिगिल’च्या चित्रीकरणादरम्यान भेटलो होतो. मी तेव्हा तिथे चेन्नई सुपरकिंग्स व कोलकाता नाइट राइडर्स यांचा सामना पाहायला गेलो होतो. सवयीप्रमाणे आम्ही तो सामना हरलो अन् त्यानंतर मला अॅटलीबरोबर वेळ घालवता आला. त्यानंतर त्याने आपुलकीने मला त्याचे चित्रपट दाखवले.”

पुढे शाहरुख म्हणाला, “त्यानंतर कोविडदरम्यान अॅटली मला भेटायला मुंबईत आला, त्यावेळी त्याने मला एका चित्रपटाची ऑफर दिली, मला ती गोष्ट खूप आवडली कारण पहिल्यांदा मला अॅटली म्हणाला, की चित्रपटात माझ्याबरोबर ५ मुली असणार आहेत. अॅटली व त्याच्या पत्नीचं असं म्हणणं होतं की महिल्यांच्या गोतावळ्यात फारच शोभून दिसतो.”

अशारीतीने शाहरुख खानच्या ‘जवान’ची सुरुवात झाली. याआधी अॅटलीने ४ चित्रपट बनवले त्यापैकी तीनही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. या तीनही चित्रपटात थलपती विजय मुख्य भूमिकेत होता. अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात शाहरुखसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, दीपिका पदूकोण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.