बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. पण त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलंही नेहमीच चर्चेचा विषय बनतात. शाहरुख खान ची लेक सुहाना ही त्यातलीच एक स्टारकिड आहे. सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असलेली सुहाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुहाना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अजून सुहाना अभिनय क्षेत्रात आली नसली तरीही तिचं मोठं फॅन फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत ती तिच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. आता सुहानाने नुकताच तिच्या डायरीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. पण या फोटोवर शाहरुख खानने कमेंट करत त्याने या डायरेक्ट सुहानासाठी काय लिहून ठेवलं आहे हे जाहीर केलं.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’ प्रदर्शित होऊन १० दिवसही झाले नाहीत आणि पार्श्वगायिका विसरली गाण्याच्या ओळी, व्हिडीओ व्हायरल

सुहाना खानच्या या डायरीचं वैशिष्ट्य म्हणजे डायरी तिला शहरूखने दिली आहे. ह्या डायरीचे चार फोटो तिने पोस्ट केले आहेत. तिला फोटो त्या डायरीचा मुखपृष्ठ दिसत आहे. दुसरा फोटो या डायरीच्या पहिल्या पानाचा आहे. त्यावर सुहाना खानचं नाव लिहिलेलं असून ही डायरी शाहरुखने तिला दिली आहे हे स्पष्ट दिसत आहे. तर तिसरा फोटोमध्ये अभिनयाबद्दल असं हेडिंग लिहिलेलं एक कोरं पान दिसत आहे आणि चौथा फोटो २०१४ असं लिहिलेलं दिसत आहे.

हेही वाचा : “माफी मागणं हे दरवेळी उत्तर नसू शकतं, पण…” ‘पठाण’च्या वादात शाहरुख खानच्या नव्या ट्वीटने वेधलं लक्ष

सुहानाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या. पण लक्ष वेधलं ते शाहरुखच्या कमेंटने. त्याने लिहिलं, “मला अभिनयातलं जे कळत नाही ते मी त्या डायरीत लिहिलं आहे. म्हणजे तू ते शिकशील आणि मलाही शिकवशील.” सुहानाच्या या फोटोवर शाहरुखची ही कमेंट हिट ठरली असून चल मीडियावर या कमेंटची जोरदार चर्चा होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan has written special note for suhana khan in her personal diary rnv