शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉयकॉट पठाण’ ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला. तर अनेक राजकीय मंडळींनी या गाण्याला विरोश दर्शवला. हा वाद सुरू असतानाच आता शाहरुखच्या तब्येतीबाबत एक माहिती समोर आली आहे. त्याने ट्वीट करत त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
शाहरुख सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी अधिकाधिक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान ‘आस्क मी एनिथिंग’ असं शाहरुखने सोशल मीडियाद्वारे म्हटलं. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला अनेक गोष्टी विचारायला सुरुवात केल्या. यावेळी एका चाहत्याने शाहरुखला त्याच्या तब्येतीबाबत विचारलं.
यावेळी शाहरुख म्हणाला, “इन्फेक्शनमुळे सध्या तब्येत ठिक नाही. म्हणूनच मी फक्त डाळ-भात खात आहे.” शाहरुखने सध्या तब्येतीमुळे त्याच्या डाएटमध्ये बदल केला असल्याचं दिसत आहे. पण शाहरुखला इन्फेक्शन कशामुळे झालं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आणखी वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…
शाहरुखच्या या पोस्टनंतर चाहते त्याच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. शिवाय ‘पठाण’चं पुढील गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारीला शाहरुख-दीपिकाचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.