बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असते. नुकताच त्याचा अगामी चित्रपट डंकीचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो.
हेही वाचा- मृणाल ठाकूर तेलगू अभिनेत्याबरोबर बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली…
शाहरुख खाने नेहमी आपल्या ट्वीटरवर ‘आस्क एसआरके’ सेशन घेतो. या सेशनमध्ये तो चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं देतो. पण या सेशनमध्ये शाहरुख स्वत: चाहत्यांचा प्रश्नांना उत्तर देतो की त्याची टीम देते असा प्रश्न अनेकांना पडतो. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘टायगर ३’ चा नवीन धमाकेदार प्रोमो प्रदर्शित; सलमान, कतरिनाबरोबर इम्रानचा अॅक्शन लूक समोर
नुकतचं शाहरुख दिग्दर्शक राजकुमार हिराणीबरोबर एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात त्याने त्याच्या ‘आस्क एसआरके’ सेशनबाबत खुलासा केला आहे. ‘अनेक लोक मला हा प्रश्न विचारतात की आस्क एसआरके सेशनमध्ये माझी टीम चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असते का? पण तसं नाहीये चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी स्वत: उत्तर देतो. अनेक वेळा लोकांना वाटतं की माझ्या सोशल मीडियावर जे काही पोस्ट केलं जातं ते माझ्या टीमकडून केलं जातं. जेव्हा काम आणि इतर सर्व गोष्टी येतात तेव्हा मी माझ्या टीमची मदत घेतो. मी त्यांना विचारतो. पण मी सोशल मीडियावर ज्या वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या जातात त्या पूर्णपणे मी लिहितो.”
शाहरुखच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर या अगोदर प्रदर्शित झालेले ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली होती. जगभरात या चित्रपटांनी २००० कोटींचा गल्ला जमवला होता. आता लवकरच त्याचा ‘डंकी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.