बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असते. सतत या स्टारकिड्सवर टीका होताना आपण पाहतो. काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. ड्रग्स प्रकरणात अडकल्याने त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. शाहरुख खानवरही वैयक्तिक टीका होत होती. आर्यन खानला या प्रकरणार क्लीन चीटही मिळाली पण अजूनही त्याच्याबद्दल चर्चा ही सुरूच आहे.

आर्यन खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार याची चर्चा बरीच वर्षं सुरू आहे. इतर स्टारकिड्सप्रमाणे शाहरुख आर्यनलाही मोठ्या चित्रपटातून पुढे आणणार असल्याच्या चर्चा आपण ऐकल्या असतील. शाहरुखची मुलगी सुहाना ही झोया अख्तरच्या वेबसीरिजमधून पदार्पण करणार आहे, पण अजूनही आर्यन खानच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल कुठेच काही चर्चा नाही. पण आर्यन आता लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.

important tips to filling upsc personality test application form
मुलाखतीच्या मुलखात : छंदांची माहिती भरतानाचे तारतम्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kevin Pietersen is available to become the batting coach of the Team India his post viral on social media
Kevin Pietersen : टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी इंग्लंडचा ‘हा’ दिग्गज उत्सुक, पोस्ट होतेय व्हायरल
Shriram Oak interviews with N M Joshi on the occasion of preserving Marathi language Pune news
मराठी भाषा संवर्धनासाठीच सारं काही…
Kapil Dev Reaction on Yograj Singh Claim That he Went to His House with Pistol to Kill Watch Video
Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
Sharad Pawar appreciate Rss work , Sharad Pawar,
संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली

आणखी वाचा : ‘कॉफी विथ करण’मधील शाहरुखच्या अनुपस्थितीविषयी करण जोहरने सोडलं मौन; म्हणाला “तो या कार्यक्रमाचा…”

‘पिंकव्हीला’च्या माहितीनुसार रेड चिलीजच्या एका प्रोजेक्टमध्ये आर्यन लेखक म्हणून काम करणार आहे. त्यासाठी तो सगळं प्रशिक्षणही घेत आहे. बरीच दिग्गज मंडळी आर्यनला याचं प्रशिक्षण देत असल्याची चर्चा सध्या होत आहे. इतकंच नाही तर शाहरुख खानने इस्राइली दिग्दर्शन लिओर राज या दिग्दर्शकालाही आर्यनच्या प्रशिक्षणासाठी पाचारण केलं असल्याचं म्हंटलं जात आहे. नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय ‘फौदा’ या वेबसीरिजचं दिग्दर्शन आणि लेखक लिओर यांनी केलं आहे. त्यामुळे अशा दिग्गज माणसाच्या तालमीत आपल्या मुलाला तयार व्हावं यासाठी शाहरुख जीवापाड प्रयत्न करतोय.

आर्यनच्या बरोबरीनेच सुहानाही झोया अख्तरच्या वेबसीरिजमधुन मनोरंजनविश्वात पदार्पण करणार आहे. या सीरिजची झलक लोकांना पाहायला मिळाली असून ती नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित होणार आहे. सुहाना बरोबरच या सीरिजमधून अमिताभ बच्चन यांचा नातूही या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Story img Loader