शाहरुख खानचा ‘जवान’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात बऱ्याक गंभीर समस्यांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. शेतकरी आत्महत्या, आरोग्य सुविधा, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटातून भाष्य केलं आहे. यापैकीच एका घटनेचा थेट संदर्भ ‘गोरखपुर हॉस्पिटल दुर्घटने’शी आहे हे नुकतंच समोर आलं आहे.

जर तुम्ही शाहरुख खानचा ‘जवान’ पाहिला असेल, तर डॉ. इरम खानची व्यक्तिरेखा पाहून तुम्हाला २०१७ च्या गोरखपूर रुग्णालयातील दुर्घटनेची आठवण नक्की होईल ज्यामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ६३ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातात डॉ. कफील खान यांना वैद्यकीय निष्काळजीपणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ‘जवान’मध्ये गोरखपूर हॉस्पिटलसारखाच अपघात दाखवल्यानंतर बरीच लोक डॉ. कफील खान यांना टॅग करून चित्रपट पाहण्याचा सल्ला देत आहेत.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा

आणखी वाचा : ‘जीस्म’साठी बिपाशा नव्हे तर सनी लिओनी होती पहिली पसंती; पूजा भट्टने सांगितला ‘तो’ किस्सा

नुकतंच डॉ. कफील खान यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “मी जवान अजून पाहिलेला नाही, पण बऱ्याच लोकांना चित्रपट पाहून माझी आठवण झाल्याची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली. फिल्मी विश्व आणि खरं आयुष्य यात बराच फरक असतो. जवान चित्रपटात आरोग्यमंत्री आणि इतर काही लोकांना शिक्षा होते, पण खऱ्या आयुष्यात मला आणि माझ्याबरोबर ८१ कुटुंबांना आजही न्याय मिळालेला नाही. शाहरुख खान आणि अॅटली या दोघांचे मी आभार मानतो की त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून हा मुद्दा उचलून धरला आहे.”

काय आहे गोरखपुर रुग्णालय दुर्घटना?

डॉ. कफील हे बाबा राघव दास (BRD) मेडिकल कॉलेज, गोरखपूरचे डॉक्टर आणि माजी व्याख्याते आहेत. थकबाकी न भरल्याने शासकीय रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचे समजताच त्यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या या मागणीकडे केवळ दुर्लक्ष करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन सिलेंडरची सोय केली होती, पण तरी यादरम्यान ६३ मुलांचा तीव्र एन्सेफलायटीस सिंड्रोममुळे मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेश सरकारने ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता हे कारण नाकारले आणि त्याऐवजी कफील यांनाच निष्काळजीपणाच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. अगदी चित्रपटातही हीच गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटात डॉ. कफील यांच्याशी मिळती-जुळती भूमिका अभिनेत्री सान्या मल्होत्राने साकारली आहे. ‘जवान’मध्ये दाखवलेल्या या सीनमुळे गोरखपुरची ही दुर्घटना पुन्हा चर्चेत आली आहे.