शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

या शुक्रवारपासून ‘जवान’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. शाहरुख खाननेही याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. शाहरुखचे चाहते अन् सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच शाहरुख खानचे वेगवेगळे फॅनक्लबसुद्धा या चित्रपटाचे वेगवेगळे शोज आयोजित करत आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : “मला राष्ट्रीय पुरस्कार…” शाहरुख खानचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा चर्चेत; सैफ अली खानशी केली तुलना

आत्तापर्यंत ‘जवान’ची ६ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपटासाठी प्रेक्षक आणि शाहरुखचे चाहते एवढे उत्सुक आहेत की सकाळचे लवकरच शोजसुद्धा हाऊसफुल झाले आहेत. ‘पठाण’च्या वेळी पहिला शो सकाळी ६ वाजता लावण्यात आला होता. आता यालाही ‘जवान’ने मागे टाकलं आहे. ‘जवान’चा पहिला शो सकाळी ५.४५ वाजता कमल सिनेप्लेक्स, नागपूर येथे सुरू होईल. दरम्यान, कोलकात्याच्या मिराज सिनेमाने ७ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता दोन शो ठेवले आहेत.

साऊथमध्ये तर पहाटे ३-४ वाजता चित्रपटांचे शो सुरू होतात. पण शाहरुख खानच्या करिअरमध्ये किंवा कोणत्याही हिंदी चित्रपटाच्या बाबतीत ही गोष्ट प्रथमच घडत आहे. उत्तर भारतात ‘जवान’ला ५००० स्क्रिन्स मिळाल्या आहेत तर संपूर्ण देशभरात तब्बल ५५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर काही बंद पडलेली सिंगल स्क्रीन थिएटरसुद्धा यानिमित्ताने पुन्हा सुरू होताना दिसत आहेत. पहिल्याच दिवशी जवान जगभरात १२५ कोटींची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अॅटलीने ‘जवान’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, दीपिका पदुकोण आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार दिसणार आहेत. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे.

Story img Loader