शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावरून मोठा वाद सुरु असतानाच आता शाहरुखने केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखने नुकतंच ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. त्यावेळी त्याने त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याच सेशदरम्यान त्याने केलेल्या एका ट्वीटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : “ही कला आहे की अश्लीलता…” ‘पठाण’च्या वादावर भाष्य करताना मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट

एका चाहत्याने ट्वीट केलं, “या सेशनमध्ये आतापर्यंत तुझा रिप्लाय न मिळाल्यांना तू काय सांगशील?” या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने अत्यंत चतुराईने उत्तर दिलं. तो म्हणाला, “माफी मागणं हे प्रत्येक वेळी उत्तर नसू शकतं…पण मी त्यांचं प्रेम समजू शकतो आणि त्यासाठी मी आभारी आहे.” आता शाहरुखचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी शाहरुख खानची बाजू घेत बोललं आहे, तर कोणी त्याच्या विरोधात बोललं आहे.

हेही वाचा : चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan lates tweet hot viral on social media rnv