अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. आज तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. वांद्रे येथे असलेल्या मन्नत या त्याच्या आलिशान बंगल्यामध्ये तो राहतो. शाहरुख खान प्रमाणेच या बंगल्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते उत्सुक असतात. शाहरुखच्या संपत्तीमधील या त्याच्या बंगल्याचा वाटा खूप मोठा आहे.
शाहरुख खान नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, त्याच्या लाईफस्टाईलमुळे खूप चर्चेत असतो. त्याचे महागडे कपडे, किंमती गाड्या पाहून सगळेच अवाक् होतात. याचबरोबर त्याचा बंगला मन्नत हा देखील नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो.
शाहरुखचा हा मन्नत बंगला २७ हजार स्क्वेअर फुटचा आहे. २००१ पासून शाहरुख त्याच्या कुटुंबीयांबरोबर याच ठिकाणी वास्तव्यास आहे. हा बंगला शाहरुखने विकत घेण्यापूर्वी त्याचं नाव विएना असं होतं. तर त्याच्या मालकाचं नाव नरिमन दुबाश होतं. २००१ मध्ये शाहरुख खानने १३.३२ कोटींना हा बंगला विकत घेतला होता.
शाहरुखने सुरुवातीला या बंगल्याचं नाव ‘जन्नत’ असं ठेवलं होतं. पण नंतर ते बदलून मन्नत असं केलं. शाहरुखने हा बंगला विकत घेतल्यानंतर त्याची पत्नी गौरी खान हिने एका आर्किटेक्टबरोबर मिळून त्याचा इंटिरियर डिझाईनिंग केलं. या बंगल्याला सहा मजले, अनेक खोल्या, एक अवॉर्ड रूम, एक छोटसं मूव्ही थिएटर, जिम आणि स्विमिंग पूलही आहे.
रिपोर्टनुसार या आलिशान बंगल्याची किंमत आज २०० कोटी आहे. त्याचबरोबर या घराच्या बाहेर लावलेल्या डायमंड नेमप्लेटची किंमत २५ लाखांच्या घरात आहे. काही महिन्यांपूर्वीची डायमंड नेमप्लेट गौरी खानने बदलून घेतली होती. मन्नत बरोबरच शाहरुखचे दिल्ली आणि लंडन येथे देखील घर आहे.