अभिनेता शाहरुख खानचे नाव बॉलीवुडमधील सुपरस्टार्सच्या यादीत आहे. फक्त शाहरुखच नव्हे तर त्याचे कुटुंबही विविध कारणांमुळे चर्चेत असते. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. गौरी खानने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. गौरी खान ही देशातील प्रसिद्ध इंटीरियर डिझायनर्सपैकी एक आहे. आता तिने तिचे स्वतःचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काल मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गौरीच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम दणक्यात संपन्न झाला. शाहरुख खानने स्वतःच्या हाताने त्याच्या पत्नीचे ‘माय लाईफ इन डिझाईन’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्या दिसत आहे की, शाहरुख खानने त्याच्या पत्नीचे वय चुकीचे सांगितले.

आणखी वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

काल पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शाहरुख खानने उपस्थितांशी मनमोकळ्या प्रकारे संवाद साधला. तर याबरोबरच त्याने पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सर्वांसमोर भाषणही केले. गौरीबद्दल त्याला वाटणारा अभिमान त्याने भाषणातून व्यक्त केला. नवी सुरुवात करायला कुठल्याही वयाची मर्यादा नसते असे सांगताना त्याने “तिने तिच्या चाळीशीत नवी सुरुवात केली,” असे म्हटले. हे वाक्य म्हटल्यावर त्याने मोठा पॉज घेतला.

हेही वाचा : “फक्त शाहरुख खानच…,” सुधा मूर्ती यांचं अभिनेत्याबद्दल मोठं वक्तव्य, दिलीप कुमार यांच्या नावाचाही केला उल्लेख

शाहरुख खानने आपल्या पत्नीचे वय चुकीचे उच्चारल्यावर तिथे उपस्थित सर्वांनाच हसू अनावर झाले. त्याने गौरीकडे बघताच ती देखील हसू लागली. त्यामुळे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शाहरुख खानच्या या उत्स्फूर्त भाषणाने सर्वांचीच वाहवा मिळवली.