शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करत आहेत. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं बघायला मिळालं.

आता मात्र तिसऱ्या दिवशी ‘जवान’च्या कमाईची गाडी पुन्हा रुळावर आल्याचं पाहायला मिळत आहे. हा विकेंड ‘जवान’साठी चांगलाच फायदेशीर ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. तिसऱ्या दिवशी ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर ६६ कोटींचा व्यवसाय केला आहे ज्यात ५ कोटींचा वाटा तमिळ तर ३.५ कोटींचा वाटा तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या व्हर्जन्सचा आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

आणखी वाचा : “मला गोळ्या घाला पण…” शाहरुखने दिलेलं अन्डरवर्ल्डला चोख उत्तर; दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी सांगितली आठवण

‘जवान’चे संध्याकाळ आणि रात्रीचे शोज हाऊसफुल गेले आणि यामुळेच याच्या कमाईमध्ये एवढी वाढ बघायला मिळाली. हे आकडे पाहता जगभरात ‘जवान’ने २४०.४७ कोटींची कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केल्याच निर्मात्यांनी दावा केला होता.

छप्परफाड कमाई करत ‘जवान’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड शाहरुखच्या ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’च्या नावे होता. या दोघांना मागे टाकत ‘जवान’ने बाजी मारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा व विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.

Story img Loader