शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट त्याच्या घोषणेपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातील त्याचा लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तो लूक सर्वांच्याच पसंतीस पडला. तसेच या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकतेच शाहरुखने त्याच्या या चित्रपटातील खास लूकचे फोटो शेअर केले होते. पाठोपाठ त्याने या चित्रपटातील दीपिकाच्या लूकचा फोटो आणि पहिल्या गाण्याची घोषणा करणारी एक पोस्ट केली होती. या फोटोमध्ये दीपिका पदूकोण पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये मादक अवतारात दिसत आहे. दीपिकाचा हा बोल्ड अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे. याबरोबरच प्रेक्षकांनी आम्हाला शाहरुखचा ‘पठाण’ लूक पाहायचा आहे असा सोशल मीडियावर तकादा लावला होता.

आणखी वाचा : काळ्या मोनोकिनी मध्ये ‘देवमाणूस’फेम नेहा खानचं हॉट फोटोशूट; अभिनेत्रीचा बोल्ड, हटके अंदाज बघा

खास चाहत्यांच्या आग्रहाखातर ‘पठाण’च्या नवीन गाण्याचं प्रमोशनसाठी नुकताच शाहरुखने या चित्रपटाच्या गाण्यातील त्याचा लूक शेअर केला आहे. शाहरुख या फोटोमध्ये पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहेत, शर्टची वरची बटणं उघडी आहेत, त्याने केस अत्यंत स्टायलिश पद्धतीने बांधले आहेत आणि एकंदरच ‘पठाण’चा हा स्वॅग लोकांना भलताच पसंत पडला आहे. या फोटोत शाहरुख अत्यंत हॉट दिसत आहे असं त्याच्या चाहत्यांनी म्हंटलं आहे.

एका चाहत्याने कॉमेंट करत लिहिलं आहे की, “एवढं हॉट दिसणं बेकायदेशीर आहे खान साहेब.” सगळेच या चित्रपटासाठी आणि उद्या प्रदर्शित होणाऱ्या यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. शिवाय यातील शाहरुख आणि दीपिका यांच्यातील हॉट केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. शाहरुख खान, दीपिका पदूकोणबरोबरच जॉन अब्राहमदेखील यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण २५ जानेवारी २०२३ या दिवशी चित्रपटगृहात धडकणार आहे.