शनिवारी सकाळी हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, इस्रायलकडून केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये सुमारे १९८ जणांचा मृत्यू झाला. तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणावर बरीच लोक व्यक्त होत आहेत. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेली बॉलिवूड अभिनेत्री नुशरत भरूचासुद्धा इस्रायलहून सुखरूप परत आली आहे.

आणखी वाचा : इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचा इतिहास व दाहक वास्तव मांडणाऱ्या ‘फौदा’ ह्या लोकप्रिय सीरिजबद्दल या गोष्टी ठाऊक आहेत का?

भारतातही या युद्धाचे पडसाद उमटत असताना किंग खान शाहरुख खानचं एक जुनं ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. शाहरुखचं हे जुनं ट्वीटही इस्रायल-पॅलेस्टाइन संदर्भातच असल्याने त्याबद्दल जास्त चर्चा होत आहे. २०१४ मध्ये जेव्हा हमासने तीन इस्रायली मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती तेव्हा त्यांच्याविरुद्ध इस्रायलने ‘ऑपरेशन प्रोटेक्टिव एज’ ही मोहीम राबवली होती. ५० दिवसांच्या या ऑपरेशनमध्ये २००० पेक्षा जास्त फिलीस्तीनी लोक मारले गेले होते.

त्यावेळी याबद्दल खेद व्यक्त करणारं ट्वीट शाहरुखने केलं होतं. आपल्या ट्वीटमध्ये शाहरुखने लिहिलं की, “लहान मुलांना मारून किंवा त्यांना कुणाचातरी मारेकरी बनवून काहीच साध्य होणार नाही. पीडितांच्या आणि पीडितांमुळे पीडित बनलेल्या लोकांच्या जीवनात यामुळे काहीच बदल होणार नाहिती. पॅलेस्टाइनमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो.”

फोटो : सोशल मीडिया
फोटो : सोशल मीडिया

शाहरुखचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल होत आहे आणि यावर लोकही प्रतिक्रिया देत आहे. काहींनी शाहरुखला दहशतवाद्यांच्या बाजूने उभय राहण्यावरुन ट्रोल केलं आहे तर काहींनी त्याला ‘गद्दार’ असंही म्हंटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan old tweet for peace in palestine getting viral during israel palestine disputes avn
Show comments