शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटातून ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. एकीकडे मोठ्या ब्रेकनंतर पुनरागमन केलेल्या किंग खानला पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत तर दुसरीकडे त्याच्या चित्रपटाबाबत प्रचंड गदारोळ सुरू आहे. ‘पठाण’चा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या चित्रपटावरून किंग खानला प्रचंड ट्रोल केले जात आहे. या सगळ्यामध्ये आता शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेता अशाच एका ट्रोलरला सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका शोचा थ्रोबॅक व्हिडीओ आहे. यामध्ये शाहरुख जितेंद्र कुमार आणि निधी बिश्तसोबत बसलेला दिसत आहे. त्यावेळी ते फोन बघून लोकांनी त्यांचया फोटोंवर केलेल्या कमेंट्स वाचत असतात, मग त्यांची नजर अशा कमेंटवर पडते. ही कमेंट पाहून जितेंद्र कुमार आणि निधी बिश्त शांत होतात पण किंग खान त्याला सडेतोड उत्तर देतो.

आणखी वाचा : वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले ‘इतक्या’ कोटींना, आकडा ऐकून व्हाल थक्क

हेही वाचा : “अरे! हा तर…” ‘झुमे जो पठाण’ पाहून नेटकऱ्यांनी शाहरुख खानची केली थेट अभिजीत बिचुकलेशी तुलना, जाणून घ्या कारण

एका ट्रोलरने शाहरुख खानच्या एका फोटोवर कमेंट करत लिहिलं, “छक्का SRK.” या कमेंटला चोख उत्तर डेट शाहरुखने ट्रोलरची बोलती बंद केली. शाहरुख म्हणाला, “मैं इतना बड़ा हूं कि चौका हो ही नहीं सकता था दोस्त, ना सिंगल रन हूं…हम तो छक्का ही मारेंगे.” शाहरुख खानची ही स्टाईल चाहत्यांनाही आवडली आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करून त्याच्या विनोदबुद्धीचं कौतुक करत आहेत.

Story img Loader