शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. तर नुकतंच एका कार्यक्रमांमध्ये शाहरुखने स्टेजवर गिरिजाचं नाव घेत तिचं कौतुक केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेलरच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुखने त्याच्या टीम मधील सर्व कलाकारांचं नाव घेत त्यांच्याबरोबर काम करताना मजा आली असं म्हटलं. तर हे सगळं बोलत असताना त्याने आवर्जून गिरीजाचंही नाव घेतलं. त्याचा एक व्हिडिओ शेअर करत गिरीजाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

गिरीजाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान स्टेजवर उभा राहून बोलताना दिसत आहे. यावेळी तो त्याच्या चित्रपटातील गर्ल्स गॅंगचं कौतुक करतो. तो म्हणतो, “…आणि माझ्या पाच सुंदर मुली. प्रियामणी जी मला वन टू थ्री फोर डान्स शिकवण्याचा प्रयत्न करत होती सो मी अजूनही शिकलेलो नाही. संजिता थँक्यू सो मच. लेहर, आलिया, गिरिजा आणि रिद्धी जी दुर्दैवाने माझ्या आईची भूमिका साकारत आहे. या सगळ्या मुली आणि स्त्रिया खूप छान आहेत. या मी तयार होण्याची सेटवर वाट बघायच्या. मला खरंच तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत.”

हेही वाचा : Video: शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘ही’ प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत, पहिली झलक समोर

हा व्हिडिओ शेअर करत गिरीजाने लिहिलं, “या माणसाची ग्रेस आणि डिग्निटी ही कमालीची आहे. मी खूप भाग्यवान आहे मला त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. अजूनही हे सगळं स्वप्नवत वाटत आहे. जवान प्रदर्शित व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत आणि शाहरुख खानने दिलेली ही ट्रीट तुम्ही सगळ्यांनी पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” तर आता गिरीजाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी कमेंट करत विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan praise girija oak performance in jawan actress shared the video rnv