शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट पुढच्या आठवड्यात २५ तारखेला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावरून वाद झाल्यानंतर चित्रपटातील कोणत्याच कलाकाराने माध्यमांना मुलाखती दिल्या नाहीत. पण, ‘यशराज फिल्म्स’ने शाहरुखचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख चित्रपटाबद्दल, सहकलाकार जॉन अब्राहमबद्दल बोलताना दिसतोय. शाहरुख आणि जॉनमध्ये सर्व आलबेल नसल्याच्या चर्चांदरम्यान शाहरुखने मात्र त्याचं भरभरून कौतुक केलंय.

Video: “तुम्ही हिंदुत्वाचा डंका वाजवता अन्…” अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून नेटकऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल!

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Marathi Actor Shubhankar Ekbote Meets Aamir Khan
“जन्म १९९४, पहिला चित्रपट पाहिला…”, मराठी अभिनेत्याचं नाटक पाहायला आला आमिर खान! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव
aamir khan son junaid khan laapta ladies audition
आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा
Aamir Khan
“सलग आठ चित्रपट फ्लॉप…”, आमिर खानबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले, “करिअर संपले…”
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”

शाहरुख जॉनबरोबर कामाचा अनुभव सांगताना म्हणाला, “मी मुंबईत आल्यापासून जॉनला ओळखतो. तो माझ्या सुरुवातीच्या काही मित्रांपैकी एक आहे, आधीची ओळख नंतर मैत्रीत बदलली. मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखतो. तो खूप लाजाळू, खूप शांत, एकांतात जगणारा आहे. जेव्हा तो चित्रपट करत होता आणि आम्ही एकत्र चित्रपट करू इच्छित होतो तेव्हा मी त्याला अनेकदा भेटलो आणि योगायोग असा की आम्ही पठाणमध्ये एकत्र काम करतोय. त्याने नकारात्मक भूमिका करायला होकार दिला, याचं मला खूप कौतुक आहे. तो टॉप स्टार आहे. त्याच्या स्वतःच्या फ्रेंचायझी आहेत, तो छान अॅक्शन चित्रपट करतोय आणि अशात नकारात्मक भूमिका करण्याचा निर्णय घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी खूप हिंमत लागते, आत्मविश्वास लागतो. बॉलिवूडमध्ये तरी हिरो नकारात्मक भूमिका करत नाहीत. पण, मला नकारात्मक भूमिका करायला आवडेल. जॉनने भूमिकेला होकार दिला, त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटतो.”

‘पठाण’साठी शाहरुख खानने घेतलं ‘इतके’ कोटी मानधन, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमला मिळाले पाचपट कमी पैसे

आपल्याला जॉनकडून बरंच काही शिकायला मिळाल्याचंही शाहरुख म्हणाला. “त्याच्याबरोबर काम करून खूप छान वाटलं आणि तो खूप चांगला आहे, याचा अनुभवही मला आला. आम्ही अॅक्शन सीन करत होतो, तेव्हा तो मला देशाचा अमूल्य खजिना म्हणाला आणि सीनमध्ये मी तुला मारणार नाही, असंही म्हणाला. तो अॅक्शन सीन खूपच उत्तम करतो. त्याने मला अॅक्शन सीन करण्यात मदत केली. तो खूपच उदार मनाचा आहे. मला वाटतं जेव्हा तुम्ही जॉन सारख्या सहकलाकारासह चित्रपट करता, तेव्हा तुम्हाला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं,” अशा शब्दांत शाहरुखने जॉन अब्राहमचं कौतुक केलं.

दरम्यान, ‘पठाण’ चित्रपटात शाहरुख खान, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत. गाण्यामुळे वादात राहिलेला हा अॅक्शन चित्रपट येत्या बुधवारी म्हणजेच २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे.

Story img Loader