शाहरुख खानचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट चांगलाच चर्चेत आहेत. चित्रपटातील गाण्यामुळे तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाला बॉयकॉट करायचीही मागणी होत आहे. शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारच कमी दिवस राहिले आहेत तरी ‘पठाण’चा ट्रेलर प्रदर्शित झाला नसल्याने सगळेच संभ्रमात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चांगलाच सक्रिय झाला आहे. नुकताच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा हॅशटॅग वापरत त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. या ट्रेंडमधून शाहरुखने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारायला सांगितले आहेत आणि त्यातील काही ठराविक लोकांच्या प्रश्नांना त्याने उत्तरं दिली आहेत.

आणखी वाचा : गाडीच्या खास नंबरसाठी हनी सिंगने मोजलेले एवढे पैसे, नंतर ‘या’ कारणामुळे विकल्या सगळ्या गाड्या

सवयीप्रमाणेच शाहरुखने त्याच्या हटके अंदाजात चाहत्यांना उत्तरं दिली आहे. एका चाहत्याने त्याला थेट नावामागे ‘खान’ का लावतो असा थेट प्रश्न विचारला आहे. एका ट्विटर युझरने ट्वीट करत शाहरुखला विचारलं, “तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी ही काश्मिरी आहे ना? तरी तुम्ही तुमच्या नावाबरोबर खान का जोडता?”

या युझरच्या या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. शाहरुखने ट्वीट करत लिहिलं, “संपूर्ण जग हे माझं कुटुंब आहे. कुटुंबाच्या नावामुळे तुमचं नाव मोठं होत नाही, तुमच्या कामामुळे तुमचं नाव होतं, कृपया अशा संकुचित विचारात अडकू नका.” शाहरुखच्या या उत्तरावर खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या माध्यमातून शाहरुखने त्याच्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘पठाण’चा ट्रेलर १० तारखेला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan responds to fans question by conducting asksrk session on twitter