शाहरुख खान गेले अनेक दिवस पठाण चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी काहींकडून केली जात आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. अशातच या चित्रपटातील कोणती गोष्ट शाहरुखला सर्वात जास्त आवडली हे त्यांने सांगितलं आहे.
शाहरुखने त्याच्या ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याचवेळी त्याने ‘पठाण’ चित्रपटातील त्याला सर्वाधिक आवडलेल्या गोष्टीबद्दल भाष्य केलं.
आणखी वाचा : जॉन अब्राहम शाहरुख खानवर नाराज? अभिनेत्याच्या कृतीने वेधलं लक्ष
त्याच्या एका चाहत्याने त्याला ट्वीट करत विचारलं, ” सर तुम्हाला पठाण चित्रपटासाठी खूप शुभेच्छा. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच वातावरण बदलून टाकलं आहे, तर आता लवकरच तुफानही येईल.’पठाण’ चित्रपटात काम करताना तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती? याची कथा की आणखीन काही?” या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, “अनेक तरुणांनी हा चित्रपट बनवण्यात हातभार लावला आहे. ती सगळेजण खूप चांगली होती आणि आजही ते दिवस-रात्र मेहनत करत आहेत. त्यांच्याबरोबर काम करायला मला सर्वात जास्त मजा आली.” त्याचं हे उत्तर सर्वांना आवडलं असून त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”
दरम्यान पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ‘पठाण’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झाला झाला आहे.