शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. प्रदर्शित होताच हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकजण ‘पठाण’ चित्रपट पाहणार नाही असं म्हणताना दिसत आहेत. या चित्रपटावरून मोठा वाद सुरु असतानाच हा चित्रपट का पाहावा याचं कारण शाहरुख खानने सांगितलं आहे.

शाहरुखने त्याच्या ट्विटरवर नुकताच त्याच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यासाठी त्याने ‘आस्क एसआरके’ (AskSRK) हे प्रश्न-उत्तरांचं एक सेशन ठेवलं होतं. या सेशनच्या माध्यमातून शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. शाहरुखनेही अनेक प्रशांना उत्तरं दिली. याच सेशदरम्यान त्याने ‘पठाण’ चित्रपट का पहावा याचं कारण सांगितलं आहे.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’चा वाद संपेना; त्यातच ‘पठाण’मधील दुसऱ्या गाण्याच्या प्रदर्शनाबद्दल शाहरुख खानचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

ट्वीट करत एका चाहत्याने त्याला विचारलं, “तुझा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? त्यावर उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, “कदाचित तो चित्रपट बघताना तुम्हाला मजा येईल म्हणून.” त्याच्या या उत्तरावर अनेकांनी त्याला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी शाहरुख खानची बाजू घेत बोललो तर कोणी त्याच्या विरोधात बोललं. आता शाहरुखचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेचा विषय ठरलं आहे.

हेही वाचा : “पठाणचा ट्रेलर का प्रदर्शित करत नाही?” चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खानचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणबरोबर जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader