बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. ते दोघेही कायमच चर्चेत असतात. गौरी खानने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. गौरी खान ही देशातील प्रसिद्ध इंटीरियर डिझायनरपैकी एक आहे. पण तिने इंटीरियर डिझाईनिंग करायला कधीपासून सुरुवात केली, याबद्दलचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौरी खानने नुकतंच ‘माय लाइफ इन डिझाइन’ या कॉफी टेबल बुकचे लाँच केले आहे. तिच्या या पुस्तकाची प्रस्तावना शाहरुख खानने लिहिले आहे. त्याचा एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यात शाहरुखने त्याचे घर आणि गौरीच्या डिझाईनबद्दलचा खुलासा केला आहे. त्यात गौरीने इंटिरिअर डिझाईनिंग करण्यास का सुरुवात केली? याचा किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : “प्रिय अनिकेत, आज आमच्या…” निवेदिता सराफ यांची लेकासाठी खास पोस्ट; Unseen फोटो केला शेअर

“जेव्हा मी आणि गौरीने आमचे पहिले घर खरेदी केले, त्यावेळी गौरी पहिल्यांदा गरोदर होती. त्यावेळी आम्हाला राहण्यासाठी जागा हवी होती, कारण आमचं पहिलं मूल जन्माला येणार होतं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला की आपल्याकडे जसे पैसे येत जातील, त्यानुसार आपण सामान खरेदी करु. त्यावेळी आम्हाला डिझायनरही परवडणार नव्हता. त्यामुळे गौरीने त्याची जबाबदारी स्वत: घेतली.

मला अजूनही आठवतंय की, आम्ही एक सोफा खरेदी करण्यासाठी दुकानात गेलो होतो. पण आम्हाला तो सोफा खरेदी करता आला नाही. कारण तो फार महाग होता. यानंतर मग गौरीचा डिझाईनिंगचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी आम्ही सोफा बनवण्यासाठी चामडे खरेदी केले आणि गौरीने एका वहीमध्ये डिझाईन तयार केले होते. त्यानंतर आम्ही ते हुबेहुब सुताराकडून बनवून घेतले.

यानंतर जेव्हा आम्ही मन्नत बंगला खरेदी केला, तेव्हाही आमच्यावर ही वेळ आली होती. त्यावेळी हा बंगला खरेदी करण्यासाठी सर्व पैसे खर्च झाले होते. आर्थिक चणचण निर्माण झाली होती. त्यानंतर गौरीने पुन्हा एकदा पुढाकार घेत मन्नत बंगल्याचे संपूर्ण इंटिरिअर डिझाईनिंग केले. यानंतर मात्र तिच्या या कामाची व्यापती वाढत गेली. तिने यानंतर अनेक व्यावसायिक डिझायनर आणि आर्किटेकला कामावर नियुक्त केले”, असे शाहरुखने यात म्हटलं आहे.

आणखी वाचा : “मलाच प्रपोज करावं लागलं होतं, कारण…” प्राजक्ता माळीने केला लव्ह लाईफबद्दल खुलासा

‘मी गरज म्हणून ज्या गोष्टींची सुरुवात केली होती, तेच आता माझं करिअर झालं आहे’, असे गौरीने या प्रस्तावनेदरम्यान म्हटले आहे. दरम्यान गौरी खानने यापूर्वी ‘ड्रीम हाऊस विथ गौरी खान’ हा शो होस्ट केला होता. यात तिने अनेक कलाकारांची घरं पुन्हा डिझाइन केली होती. तसेच नेटफ्लिक्सच्या ‘फेब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइव्हज’मध्ये तिने तिच्या डिझायनर स्टोअरची झलकही चाहत्यांना दाखवली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan reveals how gauri khan started designing because of money an expensive sofa was the reason nrp