शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याचे लाखो करोडो चाहते जगभर आहेत. अनेक चित्रपटातील विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याची मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे ‘देवदास’ हा चित्रपट आहे. आता एका मुलाखतीदरम्यान, किंग खानने ‘देवदास’ चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला आहे.

काय म्हणाला शाहरुख खान?

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुख खान हा महत्वाच्या भूमिकेत होता. आता लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘देवदास’ चित्रपटाविषयी शाहरुख खानने सांगितले, “‘देवदास’ हा असा चित्रपट आहे, जो माझ्या आईचा सर्वात आवडता चित्रपट होता. तो चित्रपट ती सतत बघायची. माझे वडीलदेखील ‘देवदास’बद्दल बोलत राहायचे. हा चित्रपट खास आहे. संजय लीला भन्साळी जेव्हा हा चित्रपट घेऊन माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी त्यांना नकार दिला होता. त्यावेळी जाताना त्यांनी मला म्हटले की, जर तू या चित्रपटात काम करणार नसशील तर मी हा चित्रपट बनवणार नाही, कारण तुझे डोळे देवदाससारखे दिसतात. पुढचे वर्षभर त्यांनी कोणालाही कास्ट केले नव्हते, त्यानंतर पुन्हा आम्ही भेटलो आणि मी चित्रपट करण्यासाठी होकार दिला.

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
Kabir Khan visits Mahakumbh Mela
महाकुंभ मेळ्यात पोहोचला प्रसिद्ध मुस्लीम दिग्दर्शक, म्हणाला, “तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर…”
Saif Ali Khan attack
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासाला नवं वळण; घरात आढळलेले बोटांचे ठसे आरोपीशी जुळत नाहीत

हेही वाचा: नवरा माझा नवसाचा २ : पहिलं गाणं प्रदर्शित! सचिन व सुप्रिया पिळगांवकरांनी जोडीने धरला ठेका; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ या तीन दिग्गज कलाकारांबरोबर काम करणे माझ्यासाठी आनंदाचे होते. माधुरी आणि ऐश्वर्या यांच्यासोबत एकाच चित्रपटात काम करणे हा सगळ्यात उत्तम अनुभव होता. पण देवदास चित्रपटात जी माझी भूमिका आहे, तशा भूमिका मला करायला आवडत नाहीत. ज्या भूमिका महिलांचा आदर-सन्मान करत नाहीत. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशा भूमिका मला करायला आवडत नाहीत.

पुढे बोलताना त्याने विनोद करत म्हटले, अनेक लोक हा विचार करतात की मी या चित्रपटासाठी फार मेहनत केली आहे. संजय लीला भन्साळी कलात्मक कारणांमुळे चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी फार वेळ घेतात. देवदासच्या वेळी त्या भूमिकेसाठी मी अनेक रात्री दारु प्यायलो आहे. नाहीतर मी दारु पित नाही. शूटिंगवेळी एका रात्री माधुरी डान्स करत असायची, एका रात्री ऐश्वर्या डान्स करत असायची. त्यावेळी मी जॅकी श्रॉफबरोबर फक्त दारु पित असायाचो. शेवटी लोक मला म्हणायचे की, तू फार मेहनत केली आहेस आणि उत्तम काम केले आहे. अर्धा चित्रपट तर असा होता.

शाहरुख खानला ७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Story img Loader