अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी चित्रपटातील भूमिकेमुळे तर कधी मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे किंग खान चर्चांचा भाग बनतो. आता अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान, त्याचा सुप्रसिद्ध चित्रपट ‘देवदास’ या सिनेमातील भूमिकेविषयी वक्तव्य केल्याने मोठ्या चर्चेत आला आहे.

शाहरुख खानला नुकताच लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, या पुरस्काराने गौरविला जाणारा तो पहिला भारतीय कलाकार आहे.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

काय म्हणाला शाहरुख खान?

फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान, शाहरुख खानने ‘देवदास’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले आहे. तो म्हणतो, “जी व्यक्तीरेखा महिलांचा अपमान करते, ती भूमिका साकारणे मला आवडत नाही. याच कारणामुळे ‘देवदास’ चित्रपटातील माझी भूमिका मला आवडत नाही आणि यामुळेच जेव्हा मी ‘देवदास’ चित्रपटात ती भूमिका साकारली तेव्हा असे वाटत होते की, माझी ही भूमिका लोकांना आवडू नये, जी महिलांचा अपमान करते, तिरस्कार करते.” असे म्हणत ज्या भूमिका महिलांकडे सन्मानाने पाहत नाहीत, त्या भूमिका करायला आवडत नाही, असे किंग खानने या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘देवदास’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला होता. शाहरुख खानबरोबरच माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन, जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी, किरण खेर, स्मिता जयकर, मनोज जोशी हे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

हेही वाचा: ‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ की ‘वेदा’, कोणत्या चित्रपटाने अ‍ॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये मारली बाजी? जाणून घ्या

याबरोबरच त्याने पहिला हिंदी चित्रपट सिनेमागृहात पाहिला होता, त्याची आठवणदेखील सांगितली आहे. त्याने म्हटले, “मी जेव्हा शाळेत होतो, त्यावेळी माझा हिंदी विषय फार चांगला नव्हता. त्यावेळी माझ्या आईने माझ्यासमोर एक अट ठेवली, ती म्हणजे हिंदी विषयात जर मी १० पैकी १० मार्क्स मिळवले तर मला चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची संधी मिळणार. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची उत्सुकता इतकी होती की, मी माझ्या एका मित्राची उत्तरे कॉपी केली आणि सुदैवाने त्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले”, अशी आठवण त्याने सांगितली आहे.

दरम्यान, लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमधील शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये शाहरुख फोटोसाठी पोज देत असून त्यावेळी फ्रेममध्ये येणाऱ्या व्यक्तीला त्याने ढकलल्याचे दिसत आहे. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी तो अहंकारी असल्याचे म्हटले आहे, तर काही नेटकऱ्यांनी तो माणूस अभिनेत्याचा जुना मित्र असून तो त्याची मजा घेत असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader