बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत याने वेगवेगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. प्रदर्शनाआधी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण त्यामुळे चित्रपटाचं फारसं नुकसान झालं नाही.

शाहरुखच्या या चित्रपटाने ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ २’सारख्या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. भारतात ५४५ कोटी तर परदेशात तब्बल ३९६.०२ कोटी इतकी कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ने केली. बॉक्स ऑफिसवर जरी तुफान कमाई या चित्रपटाने केली असली तरी बऱ्याच लोकांना हा चित्रपट काही फारसा आवडला नाही किंवा पटला नाही. या चित्रपटात खुद्द सलमान खानचाही एक जबरदस्त कॅमिओ लोकांना पाहायला मिळाला.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Guhagar Anjanvel Jetty, Nine persons caught smuggling diesel, Ratnagiri, smuggling diesel,
रत्नागिरी : गुहागर अंजनवेल जेटीवर डिझेल तस्करी करणाऱ्या नऊ जणांना पकडले, दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त
Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप

आणखी वाचा : The Kerala Story Row: केरळच्या मशिदीत पार पडला हिंदू जोडप्याचा विवाहसोहळा; एआर रेहमान यांनीही केला व्हिडिओ शेअर

आता सलमानच्या या कॅमिओवरून आणि या चित्रपटातील त्या ट्रेन सिक्वेन्सवरून लोकांनी या चित्रपटाला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. चित्रपटातील हा ट्रेनवरील चेसिंग सिक्वेन्स हा आंतरराष्ट्रीय अॅक्शन स्टार जॅकी चॅनच्या एका एनीमे शोमवरून चोरल्याची चर्चा होत आहे. खासकरून ट्रेनच्या टपावरील अॅक्शन चेस आणि ट्रेन दरीत कोसळतानाचा सीन हा जसाच्या तसा जॅकी चॅनच्या शोवरून जसाच्या तसा वापरला असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही त्या शोमधील एक छोटीशी क्लिपही यूट्यूबवर उपलब्ध आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘पठाण’ २५ जानेवारी रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहमच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.