‘पठाण’मधून कमबॅक करत शाहरुख खानने दाखवून दिलं की आजही इथला बादशाह तोच आहे. शाहरुख खानने स्वतःच्या मेहनतीवर आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. शाहरुखचं जेवढं कौतुक होतं, त्याचे जेवढे चाहते आहेत तितकेच लोक त्याला बऱ्याचदा ट्रोल करत असतात. बऱ्याचदा शाहरुखच्या वक्तव्यावरून गदारोळ झाल्याचं आपण पाहिलं असेल. अशाच एका शाहरुखच्या जुन्या वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर एका मुलाखतीमधील शाहरुखची क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरुख स्वतःच्या मुस्लीम असण्याबद्दल आणि धर्माबद्दल बोलत आहे. याबरोबरच या व्हिडीओ क्लिपमध्ये तो पाकिस्तानी असल्याचा गर्व असल्याचं बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सवयीप्रमाणेच काही लोकांनी शाहरुखला ट्रोलदेखील करायला सुरुवात केली आहे, पण शाहरुखचा हा व्हिडीओ एडिटेड केल्याचं समोर आलं आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

आणखी वाचा : “शाहरुखने ‘पहेली’ची कथा ऐकल्यावर सिगारेट शिलगावली अन्…” अमोल पालेकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

हा व्हिडीओ २०१० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमधून घेतला आहे. त्या वेळी शाहरुखने ‘झूम’ चॅनलला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये शाहरुखला धर्मावरून भेदभाव सहन करावा लागला किंवा नाही? या प्रश्नाचे उत्तर देत आहे.

शाहरुख या मुलाखतीमध्ये म्हणाला, “माझा धर्म बाजूला ठेवून साऱ्या जगाने मला स्वीकारलं आहे. काही लोकांचा गैरसमज आहे की इस्लाम हा अल्पसंख्याक आहे. पण मला हा एक मार्मिक विनोदच वाटतो, कारण मला माझ्या धर्मामुळे काही वेगळं किंवा खास असं माझ्या बाबतीत काहीच घडलेलं नाही. आपण कोणत्याही धर्माचे असलो तरी त्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. मी जन्माने मुस्लीम आहे म्हणून माझा अल्लाहवर विश्वास आहे. माझी पत्नी हिंदू आहे. तिने वाचलेली सर्व पुस्तके मी वाचली आहेत. ती जे करते त्याची मी पूजा करतो. आमची भाषा वेगळी असू शकते, पण आम्हा दोघांना जो संदेश पोहोचवायचा आहे, तो एकच आहे. लोक म्हणतात की काही देशांमध्ये माझी लोकप्रियता ही मी मुस्लीम असल्याने आहे. मला माझा मुस्लीम असल्याचा अभिमान आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे.”

शाहरुखच्या या वक्तव्यातील शेवटच्या वाक्यातील भारतीय हा शब्द काढून त्याऐवजी पाकिस्तानी हा शब्द अगदी बेमालूमपणे जोडण्यात आल्याने या व्हिडीओची चर्चा होत आहे. शाहरुख खान लवकरच आता ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याबरोबरच शाहरुख खान हा सलमानच्या ‘टायगर ३’मध्येही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Story img Loader