बॉलिवूडचा बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची दोन गाणी प्रदर्शित झाली, आणि दोन्ही गाणी विविध करणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली. हा वाद एवढा वाढला की ‘बॉयकॉट पठाण’ अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली. असं असलं तरी शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शाहरुख खानने आजवर बरेच चित्रपट केले आहेत, पण त्यात ॲक्शनपट हे फारच कमी केले आहेत. किंबहुना असा पूर्णपणे कामर्शियल ॲक्शनपट शाहरुखने केलेलाच नाही. आता तब्बल ४ वर्षांनी शाहरुख ॲक्शन चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे यासाठी खुद्द शाहरुखसुद्धा उत्सुक आहे. रोमॅंटिक चित्रपट आणि अ‍ॅक्शन चित्रपट याबद्दल शाहरुखने खुलासा केला आहे.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
Salman Khan And Digvijay Rathee
Video : ‘बिग बॉस १८’मधून बाहेर पडताच दिग्विजय सिंह राठी झाला भावुक; खंत व्यक्त करीत म्हणाला, “लोक खूप लवकर…”
Muramba
Video: “हिला रमा बनवणं अवघड…”, अक्षयसाठी मॉडर्न माही रमा बनणार का? ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो

आणखी वाचा : Pathaan Trailer : देशभक्ती, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; शाहरुख व दीपिकाच्या बहुचर्चित ‘पठाण’चा ट्रेलर पाहिलात का?

एका मुलाखतीदरम्यान शाहरुख म्हणाला, “ॲक्शनन चित्रपटात काम करायची माझी खूप आधीपासून इच्छा होती. जेव्हा मी आदित्य चोप्राला भेटलो तेव्हा त्याने माझ्यासाठी एक ॲक्शन चित्रपटच लिहिला होता. मी रोमान्स किंवा ड्रामा करू शकेन याबाबत मी साशंक होतो. पण एकेदिवशी आदित्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला की आपण अ‍ॅक्शनपट ऐवजी एखादी लव्ह स्टोरी करुयात. तेव्हापासून माझं ॲक्शन चित्रपट करायचं राहूनच गेलं.”

आणखी वाचा : चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”

पुढे पठाणबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, “यावेळी जेव्हा पठाणसाठी मला विचारणा झाली, तेव्हा कोविड परिस्थिती होती, चित्रीकरणासाठी जास्त वेळ मिळत नसे, तरी मी त्यासाठी एका पायावर तयार झालो, नाहीतर आदित्य चोप्राने पुन्हा हा बेत रद्द केला असता. मी चित्रपटासाठी शारीरिक मेहनत घ्यायला सुरुवात केली.” या मुलाखतीमध्ये शाहरुखने ‘पठाण’ हा चित्रपट त्याच्या मुलांना आवडेल अशी आशा व्यक्त केली. शिवाय ‘पठाण’चा ट्रेलर पाहून शाहरुखने स्वतः जोरात शिट्टी वाजवल्याचंही स्पष्ट केलं आहे. चाहते आता पठाणच्या ट्रेलरची वाट बघत आहेत. ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader