शाहरुख खानचा ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने आठ दिवसात देशभरात ४०० कोटींहून जास्त कमाई केली आहे, तर जगभरातील चित्रपटाची कमाई ७०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. शाहरुख खान चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रमोशन करत नाही, नंतर करतो. त्यानुसार ‘जवान’च्या टीमने १५ सप्टेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शाहरुखने एक वक्तव्य केलं, जो सलमान खानसाठी टोमणा असल्याचं म्हटलं जातंय.
अभिनेता कमाल राशीद खान म्हणजेच केआरकेने शाहरुख खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने सलमानचं नाव न घेता टोमणा लगावला आहे. शाहरुख खानने व्हिडीओत केलेलं वक्तव्य हा सलमानसाठी टोमणा होता, असं त्याने म्हटलं होतं. “हाहाहा शाहरुख खान म्हणाला, “माझा चित्रपट हिट व्हावा, यासाठी मला तो ईदला रिलीज करण्याची गरज नाही. जेव्हाही माझा चित्रपट प्रदर्शित होतो, त्या दिवशी ईद असते,” असं केआरकेने म्हटलं. सोबतच त्याने सलमानचा उल्लेख म्हातारा असा केला.
शाहरुख खान काय म्हणाला?
‘जवान’ चित्रपटाच्या यशानंतर मुंबईतील कार्यक्रमादरम्यान शाहरुख खान म्हणाला, “आम्ही २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन (पठाण) सुरुवात केली, त्यानंतर जन्माष्टमीला ‘जवान’ रिलीज केला, आता नवीन वर्ष आणि ख्रिसमस जवळ आले आहेत, आम्ही ‘डंकी’ रिलीज करणार आणि ज्या दिवशी माझा चित्रपट रिलीज होतो, त्यादिवशी ईद असते,” असं शाहरुख खान म्हणाला.
https://twitter.com/ANI/status/1702700551363059792णाला.
दरम्यान, शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती तसेच दीपिका पदुकोण विशेष भूमिकेत आहेत. चित्रपट ७ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे.