शाहरुख खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या मागच्या ‘पठाण’ या चित्रपटाने जबरदस्त व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले. आता तो त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटामुळेही चर्चेत आला आहे. अलीकडेच शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौरी खान बाइक चालवत आहे आणि शाहरुख खान तिच्या मागे बसला आहे. मात्र, शाहरुख घाबरलेल्या स्थितीत बाइकवर मागे बसलेला दिसत आहे.
व्हिडीओमध्ये गौरी समुद्रकिनारी जोरात गाडी चालवताना दिसत आहे. गाडीवर गौरीच्या मागे बसलेला शाहरुख खूप घाबरला होता. व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरुख म्हणतो, “मला थोडी भीती वाटते, पण गौरी रिलॅक्स आहे, मी स्टंट करू शकतो पण मला वेगाची भीती आहे.” गौरीने शाहरुखला बाईकवर मागे बसण्यास सांगितले. पण गौरीला वेगात बाइक चालवताना पाहून शाहरुख खूप घाबरला होता. तो वारंवार गौरीला बाइक हळू चालवायला सांगत होता. शाहरुख बाइकवरून उतरल्यानंतर सुहाना खान गौरीबरोबर बाइकवर बसण्याचा आग्रह धरताना दिसत आहे. मात्र, शाहरुख तिला आरामात गाडी चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये सुहाना खान खूपच क्यूट दिसत आहे. यासोबतच गौरी आणि शाहरुखबरोबर खास बॉण्डिंगही पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये गौरी जोरात गाडी चालवताना दिसत आहे मात्र, शाहरुखला या वेगाची भीती वाटत असल्याचं पाहायला मिळालं.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान आता ‘पठाण’नंतर ‘जवान’ची तयारी करताना दिसत आहे. याशिवाय तो सलमान खानसोबत ‘पठाण वर्सेस टायगर’मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसे शाहरुख हा सलमानच्या ‘टायगर 3’मध्ये छोट्या भूमिकेत दिसणार आहे.