‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’ या २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठे यश मिळाल्यानंतर अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. २० डिसेंबर २०२४ ला ‘मुफासा : द लायन किंग'(Mufasa: The Lion King) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लायन किंग’ चित्रपटातील मुफासा या पात्राला शाहरुखने आवाज दिला होता. तर, त्याचा मोठा मुलगा आर्यन खान याने सिम्बा या पात्राला आवाज दिला होता. आता ‘मुफासा : द लायन किंग’मध्ये शाहरुखने पुन्हा एकदा मुफासाला, तर आर्यन खानने सिम्बा या पात्राला आवाज दिला असून अभिनेत्याचा लहान मुलगा अबराम खानने लहान वयातील मुफासाला आवाज दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘डिस्ने फिल्म इंडिया’ने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खानने त्याच्या मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘द इनक्रेडिबल्स’साठी पहिल्यांदा आर्यन खानबरोबर डबिंग केले होते. त्याबद्दल बोलताना किंग खानने म्हटले, “आजच्या काळाच्या तुलनेत तेव्हा डबिंग करणे अवघड होते.” पुढे दोन्ही मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगताना त्याने म्हटले, “काम करताना दोघेही संयमाने काम करीत होते. प्रामाणिकपणे सांगायचे, तर त्यांचे वय लक्षात घेता, ते इतका संयम दाखवतील, याची मला खात्री नव्हती. दोघांनीही त्यांच्या प्रोजेक्टसाठी खूप तयारी केली होती. हिंदी भाषेतील ओळी त्यांना लक्षात राहाव्यात यासाठी त्यांनी वेळ घेतला होता.”

या संदर्भात अधिक बोलताना शाहरुख खानने म्हटले, “जेव्हा आर्यनने ‘इनक्रेडिबल’साठी डबिंग केले होते त्यावेळी मला वाटते की, लोक मोठ्या प्रमाणात हिंदी बोलत असत. त्यामुळे हिंदीमध्ये डब करणे आतापेक्षा सोपे होते. आता काळ बदलला आहे. १०-१५ वर्षांनंतर आता लोक सहज इंग्रजीत बोलतात. मला आनंद आहे की, अबरामने या प्रोजेक्टवर मोठी मेहनत केली आहे. त्याने २०-२५ हिंदी संवाद त्याची बहीण सुहानाबरोबर पाठ केले आहेत. या प्रोजेक्टमध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे.”

“अबराम व आर्यनचा आवाज जवळजवळ सारखा असून, नाजूक आहे. आता मी जेव्हा आर्यनचा आवाज ऐकतो तेव्हा ‘द इनक्रेडिबल्स’पेक्षा तो वेगळा ऐकायला येतो. ८-१० वर्षांनी आर्यनचा आवाजही वेगळा असेल. माझ्याबरोबर चित्रपटातील आर्यन व अबरामचा आवाज रेकॉर्ड असणे, ही माझ्यासाठी चांगली आठवण असणार आहे”, असे शाहरुख खानने म्हटले आहे.

हेही वाचा: १२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम

आर्यन खानच्या कामाबाबत बोलायचे तर, तो लवकरच दिग्दर्शनातून पदार्पण करणार आहे. तर शाहरुख खान हा सुजॉय घोषच्या आगामी चित्रपटात मुलगी सुहाना खानबरोबर दिसणार आहे. आता बाप-लेकीच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan shares experience of working his sons aryan and abram in mufasa the lion king nsp