Jawan Shooting Photos leaked : ‘पठाण’ला मिळालेल्या तुफान प्रतिसदानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्याच्या येणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे चित्रपट आहेत. यापैकी शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील फर्स्ट लूकचीही प्रेक्षकांनी प्रशंसा केली. ‘जवान’ हा चित्रपट शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा बिग बजेट चित्रपट आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.
हा चित्रपट २०२३च्या जून महिन्यात प्रदर्शित होणार अशी अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण आता काही कारणास्तव याची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रदर्शित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच या चित्रपटाशी निगडीत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण मुंबईच्या बांद्रा वरळी सी लिंक परिसरात झाल्याचे काही फोटोज समोर आले आहेत.
आणखी वाचा : “नसीरुद्दीन शाहचा अपघात व्हावा, यासाठी मी नवस केला होता” नाना पाटेकरांचा खुलासा; म्हणाले, “माझा देवावरचा…”
नुकतंच ‘जवान’मधील काही सीन्सचे चित्रीकरण मुंबईत पार पडल्याच म्हंटलं जात आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खान पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. याबरोबरच याठिकाणी चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण पार पडल्याचं स्पष्ट झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली आणि कोरिओग्राफर फराह खान हेसुद्धा यावेळी उपस्थित होते. दोघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१० एप्रिलला हे चित्रीकरण पार पडल्याचं म्हंटलं जात आहे. ‘जवान’मधून तमिळ अभिनेत्री नयनतारा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख आणि नयनताराबरोबरच विजय सेतुपती, सुनील ग्रोवर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबरोबरच ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.