बॉलिवूड स्टार्स बरोबरच त्यांची मुलंही खूप चर्चेत असतात. अद्याप मनोरंजन क्षेत्रात आलेले नसले तरीही अनेकांचं फॉलोईंग खूप मोठं आहे. यातीलच एक शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. त्याच्या कृतीमुळे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. पण आता सध्या सोशल मीडियावर तो खूप ट्रोल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्यन खान हा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. परंतु त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी त्याचे आणि शाहरुख खानचे चाहते खूप उत्सुक असतात. अनेकदा तो मुंबईमध्ये मी त्या ठिकाणी फिरताना दिसतो. आता नुकताच तो एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होता. यावेळी त्याने केलेल्या एका कृतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले त्यामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र’चा रेकॉर्ड मोडणाऱ्या ‘पठाण’च्या कलेक्शनबाबत आलिया भट्टची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली…

आर्यन खानने नुकतंच ऑलमोस्ट ‘प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी जावेद अख्तर, हुमा कुरेशी, राधिका आपटे, शबाना आझमी, यांसारखे अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते. या सर्व दिग्गज मंडळींनी तेथे उपस्थित असलेल्या मीडिया फोटोग्राफर्सना आनंदाने पोज दिल्या. पण आर्यन खान स्क्रिनिंगवरून आला आणि थेट आपल्या गाडीत जाऊन बसला. त्याने त्या मीडिया फोटोग्राफर्सना इग्नोर केलं. त्याच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : आर्यन खानकडून करण जोहरला मिळाला मोठा झटका, धुडकावली चित्रपटाची ऑफर कारण…

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटकरी कमेंट्स करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत आर्यन “गरज नसताना अटीट्युड दाखवतोय” असं म्हटलं. तर काहींनी त्याला “तुझ्या वडिलांकडून काहीतरी शिक”, असा सल्लाही दिला. आर्यनचा हा व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan son aaryan khan hot trolled for givng attitude to paparazzi rnv