Aryan Khan buys property in Delhi : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा मुलगा आर्यन खान याने दिल्लीत मालमत्तांची खरेदी केली आहे. आर्यनने एका आलिशान इमारतीतील दोन मजले खरेदी केले असून त्याचे वडील शाहरुख खानशी खास कनेक्शन आहे. आर्यनने या मालमत्तेसाठी तब्बल ३७ कोटी रुपये मोजले आहेत.
‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, आर्यन खानने दक्षिण दिल्लीतील पॉश एरिया पंचशील पार्कमधील दोन मजले खरेदी केले आहेत. आर्यन खानने हे दोन्ही मजले ३७ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. आर्यनने यासाठी २.६४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. या मालमत्तेची नोंदणी मे २०२४ मध्ये करण्यात आली आहे.
आर्यनच्या मालमत्तेचे शाहरुख खानशी कनेक्शन काय?
आर्यन खानने ज्या इमारतीत दोन मजले विकत घेतले आहेत त्या इमारतीत शाहरुख खान-गौरी खानचे आधीपासून दोन मजले आहेत. एकेकाळी शाहरुख व गौरी इथेच राहत होते. या इमारतीचे बेसमेंट व ग्राउंड फ्लोअर शाहरुख खानच्या मालकीचे आहेत, आता याच बिल्डिंगमध्ये आर्यनने दोन मजले खरेदी केले आहेत. आर्यन खानने खरेदी केलेल्या दोन्ही मजल्यांचे इंटीरियर त्याची आई गौरी खान डिझाइन करणार आहे.
आर्यन खानचे करिअर
आर्यन खानने (Aryan Khan Education) युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅलिफोर्नियामधून शिक्षण घेतले आहे. आर्यनने शाहरुख खानबरोबर ‘द लायन किंग’ या चित्रपटात सिम्बासाठी डबिंग केलं होतं. आता तो दिग्दर्शक म्हणून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. २०२२ मध्ये आर्यन खानने लक्झरी फॅशन ब्रँड D’yavol लाँच केला, याचा ब्रँड ॲम्बेसेडर शाहरुख खान आहे.

हेही वाचा – पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
आर्यन खानची एकूण संपत्ती किती?
शाहरुख खान व गौरी खान यांचा मोठा मुलगा आर्यन खानने D’yavol नावाचा कपड्यांचा एक लक्झरी ब्रँड सुरू केला आहे. लेटी ब्लागोरवा व बंटी सिंह हे त्याचे बिझनेस पार्टनर आहेत. त्याची ही कंपनी महागडे कपडे बनवते. आर्यन खानने एक वोडका ब्रँडही लाँच केला आहे. आर्यन खान यशस्वी बिझनेसमन आहे. आर्यन खानची (Aryan Khan Net Worth) एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे, असं म्हटलं जातं.
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव
सुहाना खानने अलिबागमध्ये घेतली जमीन
सुहाना खानने (Suhana Khan Property) जून २०२३ मध्ये अलिबागमध्ये जमीन खरेदी केली. त्या जमिनीची किंमत जवळपास १२.९१ कोटी रुपये आहे. यासाठी सुहानाने ७७ लाख ४६ हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली होती. सुहानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी ही शेतजमीन खरेदी केली होती.