बॉलिवूड कलाकारांबरोबरच अनेक स्टार किड्सनीही काजल आनंदच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी काजल आनंदची करण जोहर व्यतिरिक्त इतर अनेक बॉलिवूड कलाकारांशी चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळालं. या पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही सहभागी झाला होता. मागच्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत असलेल्या आर्यन खानचा या पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र तो आता ट्रोल होताना दिसत आहे.
आर्यन खान पार्टीच्या ठिकाणी एंट्री करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका पांढऱ्या रंगाच्या लक्झरी कारमधून खाली उतरताना दिसत आहे. तो आजूबाजूला न पाहता सरळ आत जातो. पांढर्या टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये तो खूपच हॅन्डसम दिसत आहे, पण चेहऱ्यावर नेहमीच गंभीर भाव ठेवण्याची त्याची सवय लोकांना आवडत नाही असं दिसतंय. या व्हायरल व्हिडीओनंतर लोक त्याला ट्रोल करत आहेत.
आणखी वाचा- ‘पठाण’चा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क
आर्यन खानचा या व्हिडीओतील गंभीर चेहरा पाहून एका यूजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘अरे, हा आर्यन कधीच का हसत नाही…?’ दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘कधीतरी हसून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न कर’, तर आणखी एकाने ‘स्टार्किडकडे पार्ट्यांमध्ये जाण्याशिवाय दुसरं काम नाही.’ अशी कमेंट केली आहे. याशिवाय या व्हिडीओवर ‘याचा चेहरा नेहमीच सुजल्यासारखा का असतो?’ असा प्रश्नही एका युजरने केला आहे.
आणखी वाचा- Video: स्किन टाईट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली सुहाना खान; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अगदी…”
दरम्यान २५ वर्षीय आर्यन खान आपल्या वडिलांसारखाच दिसतो. मात्र त्याला शाहरुखसारखं अभिनेता व्हायचं नाही. त्याने ‘कभी खुशी कभी गम’मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. पण त्याला अभिनयापेक्षा लिखाणात जास्त रुची आहे. लवकरच तो गौरी आणि शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या प्रॉडक्शन हाऊसमधून लेखक आणि दिग्दर्शक म्हणून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. अलिकडच्या काळात त्याचं नाव नोरा फतेही आणि पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान यांच्याशी जोडलं गेलं होतं.