२ नोव्हेंबरला शाहरुख खानने त्याचा ५८ वा वाढदिवस त्याच्या चाहत्यांबरोबर साजरा केला. याच दिवशी त्याने त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. शाहरुखचे चाहते या चित्रपटाच्या टीझरची आतुरतेने वाट पहात होते. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये शाहरुखने ‘डंकी’ चा टीझर प्रदर्शित केला. यावेळी शाहरुखबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी व लेखक अभिजात जोशीदेखील उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच ट्रेलर लॉंचदरम्यान शाहरुखने ‘जवान’च्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे. शाहरुखच्या ‘जवान’नेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. जवळपास १००० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली होती. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगलंच डोक्यावर घेतलं. यानंतर याच्या सीक्वलची जबरदस्त चर्चा रंगली होती.

आणखी वाचा : ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन्स’च्या दुसऱ्या सीझनबद्दल मोठी अपडेट; ‘HBO’च्या प्रमुखांचा रिलीज डेटबाबत खुलासा

आता ‘डंकी’च्या टीझर लॉंचदरम्यान ‘जवान २’बद्दल शाहरुख खानने स्पष्टीकरण दिलं आहे. शाहरुख ‘जवान’चा सीक्वल बनवणार नसल्याचं त्याने जाहीर केलं आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझ्यासाठी ‘जवान २’ बनवणं खूप सोप्पं आहे, मी आत्ता अॅटलीला फोन करून फ्रैंचाइज फिल्म बनवायला सांगेन. पण मी ते करू इच्छित नाही, मला नवं काहीतरी करायचं आहे. तुम्हा सगळ्यांसाठी नव्या भूमिका साकारायच्या आहेत. ‘डंकी’सारखा चित्रपट तुमचं खूप मनोरंजन करेल. अगदी खरं सांगायचं झालं तर हा चित्रपट तुम्हाला ‘जवान’ आणि ‘पठाण’पेक्षा कईक पटीने आवडेल.”

‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर आणि सतीश शाह हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. ‘डंकी’ २१ डिसेंबरला परदेशात प्रदर्शित होणार आहे. मात्र भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan speaks about sequel of jawan avn