गेल्यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये एकापाठोपाठ एक असे तीन ब्लॉकबस्टर चित्रपट देत शाहरुख खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं की बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह तोच आहे. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे शाहरुखच्या कारकीर्दीतील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले. यापैकी अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. या चित्रपटाने तब्बल ११०० कोटींचा व्यवसाय केला. याच चित्रपटासाठी शाहरुखला नुकताच उत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा पुरस्कार स्वीकारताना शाहरुखने एक मस्त दमदार असं भाषण देत प्रेक्षकांचं मन जिंकलं. याच पुरस्कार सोहळ्यात नयनतारा हिलादेखील दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘जवान’मध्ये शाहरुख दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. खासकरून म्हाताऱ्या शाहरुखच्या भूमिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. साऊथचा जबरदस्त तडका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला.

आणखी वाचा : रणवीर सिंगबरोबर जाहिरातीत झळकणाऱ्या पॉर्नस्टार जॉनी सीन्सचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, “मी आजवर…”

हा पुरस्कार स्वीकारताना शाहरुख म्हणाला, “खूप वर्षांनी मला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. मध्यंतरी मला वाटलं होतं की आता हा पुरस्कार मला कधीच मिळणार नाही. पण हा पुरस्कार घेताना मी खुश आहे, मला पुरस्कार खूप आवडतात. त्याबाबतीत मी जरा स्वार्थी आणि लालची आहे. लोकांना माझं काम आवडलं अन् त्यांनी मी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलंय यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन.”

पुढे शाहरुख म्हणाला, “एक गोष्ट नमूद करावी वाटते ती म्हणजे फक्त एका अभिनेत्यांचं काम पुरेसं नसतं. त्याच्या आजूबाजूला असणारी मंडळीदेखील जेव्हा त्यात सहभाग घेतात तेव्हा ती कलाकृती आणखी उत्तम होते. मलासुद्धा हा पुरस्कार मिळण्यामागे कित्येकांची मेहनत आणि मदत आहे. यापुढेही मी अशीच मेहनत घेईन हे वचन मी प्रेक्षकांना देतो. अन् भारतीयांचं न भारताबाहेरील प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करत राहीन. यासाठी मला जे जे शक्य होईल ते ते मी करेन. मी नाचेन, पडेन, लढेन, रोमान्स करेन, नकारात्मक भूमिकाही करेन, माझ्याकडून मनोरंजनासाठी जे जे शक्य होईल ते सर्व करेन.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan speech after getting dadsaheb phalke best actor award for jawan avn