Jawan Movie Review in Marathi : बॉलिवूड संपलं, खान मंडळींचं साम्राज्य संपलं, असे कित्येक भ्रम मोडीत काढत शाहरुख खानच्या ‘जवान’ने दहीहंडीच्या महूर्तावर बॉक्स ऑफिसवर दणक्यात हजेरी लावली आहे. चित्रपटगृहाबाहेरील आणि आतील वातावरण खरंच पाहण्यासारखं आहे. शाहरुखप्रेमी आणि चित्रपटप्रेमींनी तर हा दिवस एखाद्या सणासारखाच साजरा केला आहे, पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ‘जवान’ हा ‘पठाण’च्याच पठडीतली थोडी सुधारित आवृत्ती आहे. चित्रपटाला मिळालेला खास दाक्षिणात्य टच अन् शाहरुख खान या नावाची जादू यामुळेच ‘जवान’ थोडाफार वेगळा वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाकी कथा, पटकथेच्या बाबतीत ‘जवान’ हा ‘पठाण’ इतकाच सुमार आहे. अर्थात व्यावसायिक आणि पॅन इंडिया चित्रपट काढायचा म्हंटल्यावर त्यात आर्थिक गणितांकडेच सर्वप्रथम लक्ष जातं अन् अ‍ॅटली कुमार हा दिग्दर्शक म्हंटल्यावर कथा आणि पटकथेत फारसं काही वेगळं पाहायला मिळेल ही अपेक्षाच करणं चुकीचं आहे. आपल्या ठरलेल्या साच्यात अ‍ॅटलीने ‘जवान’ सादर केला आहे आणि तो प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचणार हे निर्विवाद सत्य आहे. तरी काहीतरी वेगळं बघायची अपेक्षा घेऊन जर चित्रपटगृहात जाणार असाल तर ती अपेक्षा पूर्ण होणार नाही.

आणखी वाचा : IPL च्या ‘त्या’ सामन्यात KKR संघ पराभूत झाला अन् शाहरुखला मिळाली ‘जवान’ची ऑफर; नेमका किस्सा जाणून घ्या

‘जवान’मध्ये बाप-लेकाची गोष्ट पाहायला मिळणार याची टीझरपासूनच चर्चा होती, याबरोबरच शाहरुखची यात दुहेरी भूमिका असणार हेदेखील लोकांना ठाऊक होतं. यापलीकडेही या कथेत देशभक्ती, सामान्य माणसांचे हक्क, कर्तव्य, भ्रष्ट सरकारी तसेच सुरक्षा यंत्रणा आणि त्याचा सामान्य माणसाला होणारा त्रास, नारीशक्ति अशा कित्येक गोष्टी ठासून भरल्या आहेत. फक्त या सगळ्या गोष्टी अगदी टिपिकल पद्धतीने समोर येतात अन् या सगळ्याच्या विरोधात एक माणूस आवाज पुकारतो अन् स्वतःबरोबर कित्येकांचा बदला घेण्यासाठी या राजकारण्यांना, सुरक्षा यंत्रणेला वेठीस धरतो. शेवटी त्याला न्याय मिळतो का? त्याच्या आईचा अन् वडिलांचा बदला तो घेऊ शकतो का? याची सगळी उत्तरं तुम्हाला या चित्रपटात मिळतात. अशी साधी सरळ कहाणी असली तरी त्याला मिळालेला खास अ‍ॅटली टच अन् शाहरुख खानचं ग्लॅमर यामुळे ‘जवान’ खास ठरतो.

कथा अगदी साधी सोपी असली तरी तिला दिलेली ट्रीटमेंट आणि वेगवान पटकथा यामुळे तब्बल अडीच तासाचा ‘जवान’ कुठेही रटाळ वाटत नाही. जी.के. विष्णु यांची सिनेमॅटोग्राफी आणि रुबेन यांचं संकलन उत्कृष्ट जमून आलं आहे अन् यामुळेच चित्रपटातील काही सीन्स उठावदार झाले आहेत. खासकरून मध्यंतराच्या अलीकडेच येणार शाहरुख खानचा एक दमदार अ‍ॅक्शन पीस आणि क्लायमॅक्सकडे येणारा एक चेस सिक्वेन्स अक्षरशः खिळवून ठेवणारे आहेत. अनिरुद्धचं पार्श्वसंगीत काही ठिकाणी फारच प्रभाव पाडतं तर काही ठिकाणी ते अगदीच सपक जाणवतं, पण शाहरुख खानच्या आजवरच्या चित्रपटांपैकी ‘जवान’चं संगीत हे वेगळं आहे हे मात्र नक्की. बाकी चित्रपटात काही सरप्राइजेस आहेत त्याबद्दल इतक्यात न बोललेलंच बरं.

याबरोबरच ‘जवान’ची आणखी एक जमेची बाजू म्हणजे जबरदस्त अ‍ॅक्शन. व्हीएफएक्सचा फारसा वापर न करता ‘डॉन’ स्टाइल शाहरुख खानला अशा फाइट सिक्वेन्समध्ये पाहायला मिळणं ही एक वेगळीच पर्वणी आहे. ‘पठाण’पेक्षा ‘जवान’मधील अ‍ॅक्शन ही उत्तम आहे कारण ती कृत्रिम वाटत नाही. याबरोबरच चित्रपटातील तगडी स्टारकास्ट यांनाही तितकंच श्रेय द्यायला हवं. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, लहर खान या अभिनेत्रींना फारसं काम नसलं तरी त्यांची कामं लक्षात ठेवण्यासारखी आहेत. बाकी एजाझ खान आणि सुनील ग्रोव्हर यांच्या भूमिकेची यात नेमकी काय गरज होती त्याचं उत्तर मात्र चित्रपटात मिळत नाही. ३८ वर्षांच्या रिद्धी डोग्राला ५६ वर्षांच्या शाहरुख खानची मानलेली आई दाखवणं यात थोडं कास्टिंगमध्ये मार खाल्ला आहे, पण तरी त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकतं. दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानच्या फ्लॅशबॅक स्टोरीपेक्षा तुरुंगातील त्या मुलींची फ्लॅशबॅक स्टोरी ही जास्त भाऊक करणारी आहे, त्यामुळे दीपिकाचा कॅमिओ हे एक फक्त मार्केटिंग गीमिकच आहे.

बाकी चित्रपटाची धुरा ही शाहरुख खान, विजय सेतुपती व नयनतारा यांच्याच खांद्यावर आहे आणि त्यांनी त्यांचं बेस्ट काम दिलं आहे. नयनताराला मध्यांतरानंतर फारसं काम नसलं तरी तिची छाप आपल्यावर पडते. विजय सेतुपती हा माणूस ठार वेडा (चांगल्या अर्थी) आहे हे ‘जवान’ पाहिल्यावर पुन्हा एकदा नक्की होतं. कोणतीही भूमिका तुम्ही या माणसाला दिली तरी ती भूमिका लोकांना आवडेल यादृष्टीने विजय जे काम करतो त्याला खरंच तोड नाही. हीरो असो वा व्हिलन विजय सेतुपती हा त्याची छाप पाडण्यात माहिर आहे हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

बाकी शाहरुख खान हे नाव त्याचा चार्म, ग्रेस, याला कसलीच तोड नाही हे खरं असलं तरी ‘जवान’मधून शाहरुखने प्रामाणिकपणे काहीतरी वेगळं सादर करायचा प्रयत्न केला आहे हे प्रत्येक फ्रेममधून जाणवतं आहे. ‘पठाण’ हा चित्रपट व्यावसायिक गणितं डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी ‘जवान’मध्ये शाहरुखने मनापासून उत्तम काम केलंय हे प्रकर्षाने जाणवतं. खासकरून यातील वडिलांच्या भूमिकेत तर शाहरुख भाव खाऊन गेला आहे. पांढरी दाढी, विस्कटलेले केस, ओठात सिगार आणि भल्याभल्या अ‍ॅक्शनस्टार्सना लाजवेल असा स्वॅग अशा अवतारात जेव्हा शाहरुख पडद्यावर दिसतो तेव्हा मनोमन असं वाटतं की हेच शाहरुखकडून अपेक्षित आहे. बाकी तो सुपरस्टार आहेच, रोमान्स किंग आहे पण याहीपलीकडे जाऊन तो एक दमदार अभिनेताही आहे हे पुन्हा शाहरुखने दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या शेवटी येणारं लाईव्ह टीव्हीवरचं शाहरुखचं भाषण हे आपल्याला त्याच्या ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’मधील शेवटच्या स्पीचची आठवण करून देतं. शाहरुखने यात खरंच तन, मन आणि धन ओतून काम केलं आहे आणि ते पडद्यावर प्रकर्षाने जाणवतं.

आणखी वाचा : Subhedar Movie Review: कथेची अभ्यासपूर्वक मांडणी, खिळवून ठेवणारा क्लायमॅक्स अन्…कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा ‘सुभेदार’?

बाकी चित्रपटात साऊथचा सगळा मसाला ठासून भरलेला आहे, त्याला साजेसं नाट्य, देशभक्तीची फोडणी, देशातील शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्य सेवेपासून थेट मतदानासारख्या मूलभूत अधिकारावरही हा चित्रपट भाष्य करतो. फरक फक्त इतकाच की हा एक कमर्शियल चित्रपट असल्याने त्याचं नाटकीय रूपांतर हे आजकालच्या ओटीटीवरील कंटेंट पाहून प्रगल्भ झालेल्या प्रेक्षकांना थोडं अतिरंजित वाटू शकतं. ही गोष्ट सोडल्यास प्रेक्षकांच्या भाषेत बोलायचं झालं तर शाहरुखचा ‘जवान’ हा पैसा वसूल मास चित्रपट आहे आणि तुमचं मनोरंजन करण्यात तो कुठेच कमी पडत नाही. फारशा अपेक्षा उराशी न बाळगता चित्रपट बघायला गेलात तर नक्कीच त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल.